Saturday, April 27, 2024
Homeजळगावजळगावात डेल्टा प्लस : काय आहे हा कोरोनाचा नवीन आवतार? किती घातक?

जळगावात डेल्टा प्लस : काय आहे हा कोरोनाचा नवीन आवतार? किती घातक?

मुंबई :

कोरोनाची दुसरी लाट आता कमी होत असतांना कोरोनाचा नवीन अवतार महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यात पोहचला आहे. शास्त्रज्ञांनी त्याला ‘डेल्टा प्लस’ (AY.1 Variant) हे नाव दिले आहे. येत्या ६ ते ८ आठवड्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असतांना राज्यात २१ डेल्ट प्लसचे रुग्ण सापडले आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील सात आहेत.

- Advertisement -

मल्ल्या, मोदी आणि चोक्सीची 9371 कोटींची संपत्ती बँकांच्या ताब्यात

डेल्टा प्लस व्हायरसमुळे राज्याचा आरोग्य विभागही सतर्क झाला आहे. राज्यात २१ रुग्ण सापडल्यामुळे केंद्र सरकारनेही राज्याला अलर्ट केले आहे. “या व्हेरियंटने ग्रस्त रुग्णांनी कुठे प्रवास केला. त्यांचे लसीकरण झाले का, कोरोनाची पुन्हा लागण झाली का? ही माहिती राज्य शासनाकडून गोळा केली जात आहे,’ असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

काय आहे डेल्टा प्लस

व्हायरस काहीही असो, तो नेहमी त्याची अनुवांशिक रचना बदलत राहतो. विषाणू जेव्हा त्याची रचना बदलते, तेव्हा त्याला शास्त्रज्ञ एक नवीन नाव देतात. कोणताही विषाणू त्याच रुप बदलत असतो. ज्यावेळी लोक विषाणूचा प्रभाव नष्ट करण्यासाठी लस किंवा औषध घेतात, त्यानंतर स्वत:ला वाचण्यासाठी विषाणूकडून रुप बदले जाते.

नवीन डेल्टा प्लस व्हेरियंट (B.1.617.2.1 किंवा AY.1) डेल्टा मधील उत्परिवर्तनामुळे किंवा B.1.617.2, व्हेरिएंटमुळे तयार झाला आहे. कोरोना व्हायरसच्या स्पाईक प्रोटीनमध्ये म्हणजेच जुन्या वेरिएंटमध्ये काही बदल झाले आहेत. यामुळेच नवा वेरिएंट समोर आला आहे. N501Y मधील पूर्वीच्या डेल्टा उत्परिवर्तीच्या बाजूने, डेल्टा प्लसमध्ये K417Nचे उत्परिवर्तन आहे. संशोधकांना वाटते की, या दोन उत्परिवर्तनांमुळे हा विषाणू अधिक संक्रमित होऊ शकतो. तसेच, कॅसिरिविमॅब आणि इमदेविमॅब सारख्या मानवनिर्मित अँटीबॉडी यापासून मुक्त होण्यास मदत करतात. जे सध्या भारतात कोरोना उपचारासाठी आणीबाणीच्या काळात वापरासाठी कार्यरत मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेलची लक्षणे आहेत.

डेल्टा वेरियंट म्हणजे बी.1.617.2 स्ट्रेनच्या म्युटेशनने डेल्टा प्लस वेरिएंट बनलं आहे. या म्युटेशनला K417N म्हटलं जातंय. स्पाईक प्रोटीनच्या मदतीनेच हा व्हायरस शरीरात प्रवेश करतो आणि आपण संक्रमित होतो. K417N म्यूटेशनमुळे व्हायरस आपल्या इम्युन सिस्टिमसाठी धोकादायक असतो.

मराठा आरक्षण : सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल

काय आहे उपाययोजना

कोरोना डेल्टा विषाणूनंतर डेल्टा प्लस चर्चेत आहे. यापासून बचाव करण्यासाठी स्वतंत्र उपाययोजना करण्याची गरज नाही. आतापर्यंत जी खबरदारी आपण घेत होतो तिच खबरदारी आता घ्यावी लागणार आहे. म्हणजेच मास्कचा वापर, हात स्वच्छ ठेवाणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे लागणार आहे. आपण आतापर्यंत वापरत असलेली लस या व्हायरसवर देखील प्रभावी असल्याचे सांगितले जात आहे. परंतु पुढील काळात लस किती प्रभावी आहे ? हे संशोधनानंतर समजण्यास मदत होणार आहे.

जळगाव जिल्ह्यात आढळून आलेल्या डेल्टा प्लसच्या ७ रुग्णांनी घरीच उपचार घेतले आणि ते ठणठणीत झाल्याचा दावा जिल्हाधिकाऱ्यांनी केला. मात्र त्यावर अजून वैज्ञानिकांचे संशोधन सुरु असून तो कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतील विषाणूपेक्षा घातक आहे की केवळ त्याचा स्टे्रंट बदलला आहे याबाबत अजून काहीच माहिती नसल्याचे देखील जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले आहे.

सर्वाधिक रुग्ण रत्नागिरीत

रत्नागिरीत ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटचे सर्वात जास्त 9 रुग्ण

जळगावात 7 रुग्णांना ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटची लागण झाल्याची माहिती

मुंबईत 2 रुग्णांना ‘डेल्टा प्लस’चा संसर्ग

पालघर, ठाणे, सिंधुदुर्गमध्ये ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटचा प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला.

केंद्र सरकारची एडवायजरी

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार डेल्टा प्लस व्हेरियंटला कसे सामोरे जावे यासंबंधी माहिती देण्यासाठी राज्यांना पत्र लिहिले गेले आहे. भारतीय SARS-CoV-2जीनोमिक कन्सोर्टियाच्या नुकत्याच झालेल्या निष्कर्षांच्या आधारे महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश यांना मार्गदर्शक तत्त्वांनुसार या प्रकाराला सामोरे जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये याची प्रकरणे समोर आली आहेत, त्या ठिकाणी कंटेनमेंटचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.

- Advertisment -

ताज्या बातम्या