Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedपंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे सोशल मीडियात चर्चेत आलेले टेलिप्रॉम्प्टर आहे काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे सोशल मीडियात चर्चेत आलेले टेलिप्रॉम्प्टर आहे काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi)सोमवारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस अजेंडा समिटमध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांना भाषण थांबवावे लागले. यासंदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत, दावा केला जात आहे की, पंतप्रधानांना टेलिप्रॉम्प्टरमध्ये (teleprompter)आलेल्या अडचणीमुळे भाषण थांबवावे लागले.

टेलीप्रॉम्पटला Autocue देखील म्हटले जाते. या डिव्हाइसचा वापर टेक्स्ट वाचण्यासाठी आणि कॅमेऱ्यासमोर केला जातो. यामुळे समोर बसलेल्या लोकांना, समोरचा व्यक्ती वाचून बोलत असल्याची भनकही लागत नाही.

- Advertisement -

टेलीप्रॉम्पटरचे अनेक प्रकार आज बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, राजकीय नेते ज्या पद्धतीच्या टेली प्रॉम्प्टरचा वापर करतात, ते पारदर्शक काचेसारखे असते. हे प्रेक्षकांना सामान्य काचेसारखे वाटते, परंतु स्टेजवर असलेल्या व्यक्तीला सर्वकाही स्पष्टपणे दिसते.

टेलीप्रॉम्पटरचा आणखी एक प्रकार वृत्तवाहिन्यांमधील न्यूज रुममध्ये वापरला जातो. बातम्या देणारा एँकरसमोर टेलीप्रॉम्पटर असते. त्यावरुन वाचून तो बातम्या देत असतो.

न्यूज रुममध्ये या पद्धतीने बातम्या वाचणाऱ्या ऍंकरला टेलीप्रॉम्पटरवरुन बातम्यांचे वाचन करता येते.

टेलिप्रॉम्प्टरचे नियंत्रण स्क्रीन पाहणाऱ्या व्यक्तीकडे असते, यामुळे मजकुराचा वेग सहजपणे वाढवता अथवा कमी करता येतो. मात्र, पंतप्रधान आणि इतर नेते वापरतात ते टेलीप्रॉम्पटर थोडे वेगळ्या प्रकारचे असते.

मोदींप्रमाणे अनेक राजकीय नेते टेलिप्रॉम्प्टरचा वापर करत असतात. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प, बराक ओबामाही याचा नेहमी वापर करत होते.

टेलीप्रॉम्पटरला Conference Teleprompter देखील म्हटले जाते. यात LCD मॉनिटर खालच्या बाजुला असते. ज्याचा फोकस वरच्या बाजुला असतो. वक्त्याच्या आस-पास ग्लास लगलेले असतात. ते अशा प्रकारे अलाय केलेले असतात, की LCD मॉनिटरवरील टेस्क्ट त्यांवर रिफ्लेक्ट होतात. अशा प्रकारे पंतप्रधान मोदी आपले भाषण कुठल्याही अडथळ्याशिवाय टेलीप्रॉम्पटरच्या सहाय्याने पूर्ण करतात.

पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावरील भाषण जर लक्षपूर्वक पाहिले असेल, तर त्यांच्या आजूबाजूला एक ग्लास पॅनल दिसते. अनेक जण याला बुलेट प्रूफ ग्लासही समजतात, पण प्रत्यक्षात ते एक टेलिप्रॉम्प्टर असते.

- Advertisment -

ताज्या बातम्या