Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यारँगिग काय आहे ? यासंदर्भातील कायदा काय?

रँगिग काय आहे ? यासंदर्भातील कायदा काय?

नाशिकमधील (nashik)मेडिकल कॉलेजमध्ये (Medical College) वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डॉक्टर विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत डॉक्टरांच्या कुटुंबाने रँगिंगमुळे मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. डॉ. स्वप्निल शिंदे (Dr Swapnil Shinde) असे या मृत डॉक्टरांचे नाव आहे. नाशिकमधील या घटनेमुळे पुन्हा शैक्षणिक क्षेत्रातील रँगिग (ragging)सारख्या गंभीर प्रकाराची चर्चा सुरु झाली आहे.

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या; कुटुंबियांच्या आरोपाने सर्वत्र खळबळ

- Advertisement -

रॅगिंगच्या (ragging) विरुद्ध सर्वोच्च न्यायालय, विद्यापीठ अनुदान आयोगाने यापुर्वी अनेक वेळा निर्देश दिलेत. महाराष्ट्र शासनाने वीस वर्षांपूर्वी कायदा केला. प्रत्येक महाविद्यालयात रॅगिंगविरुद्ध (ragging)समिती आहे. त्यानंतरही रॅगिंगच्या घटना विविध व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांमधून उघडकीस येतात. दोन वर्षांपुर्वी जळगावातील डॉ. पायल तडवी (payal tadvi)हिने आत्महत्या केल्याचे प्रकरण राज्यात चांगलेच गाजले होते. एका तरूण डॉक्टरच्या अशा मृत्यूने अनेकांना धक्का बसला आहे. तसेच या घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्रातील भेदभाव आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या मानसिक ताणाचा प्रश्नही उजेडात आला होता. त्यानंतर आता नाशिकच्या घटनेमुळे असे प्रकार सुुरुच असल्याचे दिसून आले. नाशिकच्या घटनेत रँगिग करणाऱ्या मुली असल्याचा आरोप डॉ.स्वप्निल याच्या कुटुंबियांनी केला. याप्रकरणी दोन मुलींसह कॉलेज प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे.

रँगिंग म्हणजे काय?

कोणत्याही शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्यास शारीरिक किंवा मानसिक हानी पोहोचत असेल किंवा पोहोचण्याची शक्यता असेल किंवा त्याच्यात धास्तीची, भयाची, लज्जेची किंवा अडचणीत आल्याची भावना निर्माण होत असेल, असे गैरवर्तणुकीचे प्रदर्शन करणे किंवा असे कोणतेही कृत्य करणे म्हणजे रॅगिंग अशी व्याख्या कायद्यात करण्यात आली आहे.

सुरुवातीला रँगिग (ragging)हा प्रकार छोटय़ा गोष्टींनी सुरू झाला होता. त्यात ओळख करुन देण्याचा उद्देश होता. त्यानंतर त्याचे स्वरुप गंभीर होऊ लागले. सगळ्यांसमोर नाचायला, गायला लावणे, कोणालाही शिव्या द्यायला लावणे, मुला-मुलीला प्रपोज करणे, छेड काढणे, शिक्षकांची टिंगल किंवा खोडय़ा करायला सांगणे, काही तरी खाण्या-पिण्यास सांगणे / अमली पदार्थाचं सेवन करण्यास सांगणे, अश्लील दृक्श्राव्य फिती पाहावयास सांगणे, अश्लील कृतीत सहभाग घ्यावयास सांगणे, शारीरिक इजा पोहोचवणे असे प्रकार सुरु झाले. त्यानंतर रँगिग रोखण्याच्या उपययोजना करण्यासाठी अनेक समित्या तयार झाल्या. त्यांनी आपले अहवाल दिले. कायदे करण्यात आले. परंतु हे प्रकार अजूनही थांबलेले नसल्याचे नाशिकमधील घटनेनंतर दिसून आले.

न्यायालयाच्या आदेशानुसार यूजीसीने रॅगिंग (ragging)प्रतिबंधक कायदा आणि नियमावली तयार केली आहे. यात खालील बाबी नमूद करण्यात आल्या आहे.

  • रॅगिंगविरोधी पथक करावे.

  • कॉलेजस्तरावर रॅगिंगविरोधी विभाग/समिती नेमावी.

  • सीसीटीव्ही कार्यान्वित करावे.

  • विद्यापीठांनी समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी.

  • विद्यार्थ्यांशी नियमित सुसंवाद, मार्गदर्शन शिबिरे घ्यावीत.

  • माहितीपत्रकात रॅगिंगविरोधी सूचना द्याव्यात.

  • वसतिगृहे, कँटीनमध्ये भेट द्यावी.

कायद्यात शिक्षेची तरतूद काय?

जी कोणी व्यक्ती शैक्षणिक संस्थेमध्ये किंवा संस्थेच्या बाहेर एखाद्या विद्यार्थ्याला रॅगिंग (ragging)करत असेल, ती व्यक्ती तसेच त्या व्यक्तीला साथ देणारे आणि रॅगिंगचा (ragging)प्रचार करणारे सर्व विद्यार्थी यामध्ये दोषी धरले जाऊ शकतात. यासंदर्भात अपराध सिद्ध झाल्यानंतर दोन वर्षांपर्यंतच्या कारावासची शिक्षा होऊ शकते. तसेच दहा हजार रुपयापर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो.

तक्रार कुठे कराल?

१८००-१८०-५५२२ या टोल फ्री क्रमांकावर २४ तास तक्रार करता येऊ शकते.

[email protected] यावर मेल करुन तक्रार दाखल करता येऊ शकते.

- Advertisment -

ताज्या बातम्या