
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
एमबीए अभ्यासक्रमाच्या द्वितीय सत्राच्या (MBA) (Management Course Examinations) आजच्या पेपरलाही जुनीच प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात आल्याने ‘विद्यापीठात नेमके चाललंय तरी काय?’ असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. दरम्यान जुन्या प्रश्न पत्रिकेवरून विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. एमबीए अभ्यासक्रमाच्या ्रप्रथम सत्राच्या (बॅकलॉग) पेपरला तीन महिन्यापूर्वीचीच ( (Old question paper)) प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार दै. देशदूतने ‘ व्वा रे विद्यापीठाचा कारभार’ या मथळ्याखाली प्रकाशित करून उघडकीस आणला. हा प्रकार उघड झाल्यानंतर विद्यापीठ क्षेत्रात झाडाझडती सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून (Examination Department in the University) याबाबत अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.
आठ पैकी पाच पेपरला जुन्याच प्रश्नपत्रिका
विद्यापीठाच्या माध्यमातून शहरातील अनेक केंद्रांवर एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रथम (बॅकलॉग) आणि द्वितीय सत्राच्या परिक्षा घेण्यात आल्या. यात आठ पैकी पाच पेपरला विद्यार्थ्यांना जुन्याच प्रश्नपत्रिका देण्यात आल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली. दि. 20 मे 2023 रोजी एमबीए द्वितीय सत्राच्या बिझनेस एथिक्स अॅण्ड सीएसआर या विषयाच्या पेपरला चक्क डिसेंबर 2022ची जुनीच प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्यामुळे कालच्या प्रकाराचा पाढा पुन्हा वाचला गेल्याने विद्यार्थी पुन्हा संभ्रमात पडले. तसेच शहरातील इतर काही केंद्रांवरही बीबीए या अभ्यासक्रमाच्या विषयांबाबत हाच प्रकार घडला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जबाबदारी कुणाची?
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा राज्यात एक आगळावेगळा ठसा राहीला आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून अनेक स्तुत्य उपक्रम राबविले जातात. मात्र ऐन परीक्षा काळात आणि परीक्षा संपल्यानंतर पेपर आणि उत्तरपत्रिकांबाबत काही ना काही गोंधळ उडाल्याचा प्रकार अनेकदा घडला आहे. आता एमबीए अभ्यासक्रमाच्या परीक्षांबाबत जुन्याच प्रश्नपत्रिकांवरून गोंधळ उडाला आहे. तरी याला जबाबदार कोण? त्यावर काय कार्यवाही होईल? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तासाभरात बदलविली प्रश्नपत्रिका
एमबीए अभ्यासक्रमाची परीक्षा आज सकाळी 10 आणि दुपारी 2 अशा दोन सत्रात घेण्यात आली. दुपारी 2 वाजेच्या सत्राच्या पेपरला जुनीच प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना दिली. 20 मिनीटे विद्यार्थ्यांनी पेपरही सोडविला. अचानक काही प्राध्यापकांच्या लक्षात आले आणि प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका घेत त्या बदलवून दुपारी पुन्हा पेपर सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एमबीए अभ्यासक्रमाच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्याना जुनी प्रश्नपत्रिका मिळाल्याच्या तक्रारीची तपासणी करण्यात आली आहे. तांत्रिक चुकीमुळे हा प्रकार घडला आहे. तसेच मध्यंतरीच्या काळात सलग परीक्षा घेण्यात आल्यानेही असा प्रकार घडू शकतो हे मान्य आहे. तसेच हा प्रकार घडण्याला अनेक कारणेही असू शकतात. तरी यासंदर्भात कुलगुरू महोदयांशी चर्चा झाली असून याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल.
प्रा. डॉ. दीपक दलाल, परीक्षा नियंत्रक