पक्ष्यांचा विणीचा कालखंड म्हणजे नेमकं काय?

पक्ष्यांचा विणीचा कालखंड म्हणजे नेमकं काय?

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकमधील एका महाविद्यालयाच्या नवीन इमारती समोर फार्मसी गार्डन आहे तेथे वाढलेली झाडी सुगरणीच्या आकर्षक खोप्यांनी भरून गेली आहेत.

सुगरण पक्ष्यांचा जून ते ऑगस्ट हा वीणीचा हंगाम असला तरी महाविद्यालयीन परिसरात याआधी त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण घरटे कधी दिसले नव्हते. त्यामुळे यंदा सुबक कलाकुसरीचा सुगरणीचा खोपा पक्षीमित्र आणि विद्यार्थ्यांसाठी आकर्षण ठरणार आहे हे नक्की.

साधारणतः जून ते ऑगस्ट हा सुगरण पक्षांचा वीणीचा हंगाम मानला जातो. या काळात दाट झाडाझुडुपात, विहिरींमधील झाडावर तसेच शेतीच्या परिसरात सुगरणीचे खोपे दिसतात. झाडांच्या व पानांच्या लांबसडक काड्यांचे सुबक विणकाम केलेली ही घरटी नागोबाच्या पुंगीच्या आकाराची असतात.

दूरवरून ही आकर्षक घरटी दिसतात. सध्या 'महावीर' परिसरातील झाडाझुडुपात अशी घरटी दिसू लागली आहेत. पक्षी मित्र म्हणून मी निरीक्षण करताना ही घरटी कॅमेराबद्धही केली.

वीणीच्या हंगामात सुगरण पक्ष्यांतील नरपक्षी मजबुत घरटे बांधतो. पण हे घरटे अर्धवट बांधलेले असते. सुगरण मादी पक्ष्यांचे थवे अशा अर्धवट घरट्यांचे निरीक्षण करतात व त्यातील त्यांना योग्य वाटणारे घरटे निवडून त्याचे राहिलेले निम्मे वीणकाम ती मादी सुगरण पक्षी करते.

अनेक ठिकाणी काही पूर्ण झालेली तर काही अर्धवट घरटी आपल्याला दिसून येतात. जी अर्धवट राहिलेली घरटी असतात, ती मादी सुगरण पक्षांकडून रिजेक्ट झाल्याचे समजले जाते. पर्यायाने ते घरटे तयार करणारा नर पक्षीही नाकारला गेल्याचे मानले जाते. मादी घरटे पूर्ण करून त्यात ६ ते ७ अंडी ठेवतात.

१५-२० दिवसात पिल्ले यातून डोकावू लागतात. सुमारे महिनाभर हा परिवार या परिसरात राहतो व नंतर उडून जातो असे अध्ययन केल्यावर कळले. ते पुन्हा या घरट्यांकडे येत नाही. चिमण्यांप्रमाणे सुगरण पक्षीही झाडांवरच राहतो.

पक्ष्यांमधील इंजिनिअर म्हणून सुगरण पक्षी ओळखला जातो, दरवर्षी हे पक्षी नवी वसाहत करतात. नक्की या मग महावीर परिसरातील सुगरणीच्या खोप्यांच्या गार्डनला भेट द्यायला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com