Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यानववर्षाचे जल्लोषात स्वागत

नववर्षाचे जल्लोषात स्वागत

नाशिक | प्रतिनिधी Nashik

घड्याळात रात्री १२ वाजेचा पडलेला ठोका.. त्याचवेळी फटाक्यांच्या आतषबाजी.. तरुणाईचा सुरू झालेला जल्लोष अशा वातावरणात शहरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.(Welcome to New Year 2023 ).नववर्षाच्या स्वागतासाठी सायंकाळपासूनच हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि ढाबे गर्दीने फुलून गेले होते.

- Advertisement -

सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत सर्वत्र जल्लोषात करण्यात आले. भाविकांनी विविध देवस्थानांवर गर्दी केल्याचे चित्र होते. नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी मातेच्या मंदिर (Saptshrungi Temple )परिसरात देखील भाविकांनी गर्दी केली आहे. याचबरोबर हिल्स स्टेशन्स आणि पर्यटन स्थळांवरही मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसले. कुटूंबासोबत विकेन्ड घालवत नववर्षाचे स्वागत करण्याचा ट्रेण्ड दिसून आला. अनेक धरणांच्या परिसरातही टेंट संस्कृती रूजतांना दिसते. निसर्गाच्या सान्निध्यात राहून अनेकांनी सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत केले.

सालाबादप्रमाणे नव्या वर्षाची सुरुवात अनेक भाविक भक्त श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे श्री भगवतीच्या दर्शनाने करतात. त्यामुळे श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे नववर्षाच्या दरम्यान भाविक-भक्तांची प्रचंड गर्दी लोटते. यावर्षी नववर्षाच्या स्वागतासाठी नेहमीपेक्षा जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंदिर देवस्थानच्या वतीने येणार्‍या भाविकांची गर्दी विभागली जावी आणि सर्वांना सहजतेने भगवती दर्शन घेता यावे यासाठी नुतन वर्ष प्रारंभास विविध राज्यातून येणार्‍या भाविक-भक्तांसाठी श्री भगवती मंदिर 24 तास खुले ठेवण्यात येणार आहे.

शिर्डीचे साईबाबा मंदिर, वणीची सप्तशृंगी माता आणि इतरही मंदिरांत भाविक भक्तांची अलोट गर्दी झाली. अनेक भक्त पालख्या घेऊन पवित्र स्थळांवर दाखल झाले. सप्तशृंगी मातेच्या मंदिराच्या नियमित वेळेप्रमाणे सर्व काही होणार असून भाविकांना करोना नियमांचे पालन करण्यासाठी मास्क सक्ती करण्यात आलेली आहे.

नव्या वर्षाच्या स्वागताला या ठिकाणी प्रचंड गर्दी असल्यामुळे मास्क बंधनकारक आहे. रामकुंड, म्हसरुळ येथे दीपोत्सव साजरा करण्यात आला.सद्गुरु श्रीमत परमहंस स्वामी सुमंताश्रमजी महाराज (स्वामी सखा) यांच्याकडून सहस्त्र दीप प्रज्वलन सोहळा झाला. सरत्या वर्षाचा समारोप आणि नववर्षाची सुरवात नेहमीच मंगलमय, प्रसन्न प्रकाशमय झाली पाहिजे.म्हणून सालाबादप्रमाणे याहीवर्षी 31 डिसेंबर व नवीन वर्षाची सुरुवात प्रसन्न वातावरणात परमेश्वराला साक्षीला ठेवत त्याच्या चरणी लीन होऊन गोदातीरी पवित्र श्रीरामकुंडावर सहस्ञदिप प्रज्वलित करुन केल्याचे त्यांनी सांगीतले. रात्री 9 ते 12.30पर्यंत दीपोत्सव साजरा झाला.

दिगंबर जैन समाजाचे मुनी पुलकसागर महाराज यांच्या सानिध्यात आज दिवसभर गजपंथ मंदिर, म्हसरूळ येथे विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम झाले. सहस्त्र दीप पूजन, व रात्री प्रवचनात जैन बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 1 जानेवारीसही 108 विद्यार्थ्यांकडून कलश अभिषेक, दुपारी विश्व शांती यज्ञ होणार आहे. यावेळी जीएसटी आयुक्त तथा गजपंथचे कार्याध्यक्ष सुमेरकुमार काले, उपाध्यक्ष सुवर्णा काले, विश्वस्त सोनल दगडे, अनिल कासलीवाल, पहाडे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या