
मुंबई | Mumbai
आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) मुंबई (Mumbai) दौऱ्यावर येणार आहेत. मुंबईत विविध विकासकामांचे त्यांच्या हस्ते उद्धाटन होणार आहे. मुंबईत गेल्या आठवडाभरापासून पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी भाजप (BJP) आणि बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shivsena) जय्यत तयारी करत आहेत...
बीकेसीत (BKC) मोदी जनतेला संबोधित करणार असून या सभेला जास्तीत जास्त गर्दी करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. मोदी मुंबई दौऱ्यावर असल्याने शहरात ठिकठिकाणी त्यांच्या स्वागताचे पोस्टर झळकवण्यात आले आहेत.
ज्याठिकाणी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची सभा होणार आहे तिथे लावण्यात आलेली स्वागत कमान कोसळली आहे. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. स्वागत कमान कोसळल्यानंतर आयोजकांकडून पुन्हा कमान उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
मात्र कमान कोसळली तेव्हा तिथे लोकांची गर्दी झाली. ही गर्दी हटवण्याचे काम बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांकडून करण्यात आले. मोदी मुंबईत (Mumbai) येण्यापूर्वीच ही कमान कोसळल्याने याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. बीकेसीत सभा ठिकाणी मुख्य प्रवेशद्वाराजवळ ही कमान लावण्यात आली होती. कमान कशी कोसळली हे अद्याप कळलेले नाही.