तौत्के घोंघावतंय; नाशिक विभागासह इतर परिसरात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

तौत्के घोंघावतंय; नाशिक विभागासह इतर परिसरात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

पुणे | प्रतिनिधी

चक्रीवादळाचे केंद्र मुंबईपासून समांतर पश्चिमेकडे सुमारे १५० ते १९० किमी समुद्रात आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे वादळी वारे, समुद्राच्या उंच लाटा अपेक्षित आहेत. मुंबई तसेच जवळील उपनगर, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर मध्यम ते जास्त पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यातील पुर्वेकडील बाजूस आणि घाट क्षेत्र हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आले आहे...

तौत्के घोंघावतंय; नाशिक विभागासह इतर परिसरात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता
Tauktae Cyclone चक्रीवादळाचा मुंबईला जबरदस्त तडाखा

तुरळक मोठ्या पावसाच्या सरी

नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळित होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पावसाळी वातावरण असल्याने विषाणू संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याचा धोका असल्याने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

किनारपट्टीवर वादळी वाऱ्यांची शक्यता असल्यामुळे झाडे पडणे, खांब वाकणे, विजेच्या तारा पडणे, होर्डिंग्ज पडणे, पत्रे उडणे, कच्च्या भिंती पडणे आदी घटना घडू शकतात. वादळाचा प्रभाव पुर्ण ओसरेपर्यंत घरातून बाहेर पडणे टाळावे. अशी माहिती हवामान अभ्यासक राहुल रमेश पाटील यांनी दिली. पाटील हे हवामान साक्षरता लोकचळवळीचे संस्थापक आहेत.

गेल्या सहा महिन्यांपासून चक्रीवादळाची मालिका सुरू आहे. राज्यासह देशातील वातावरणात वेगाने बदल होत आहे. सध्या थंडीत चढउतार होत असून, उत्तर भारतातील अनेक भागांत थंडीची लाट येत आहे. तर काही भागांत पाऊस पडत असल्याने थंडी कमी अधिक स्वरूपात होत आहे. यातच मागील पाच ते सहा दिवसांपासून हवामान कोरडे झाल्याने थंडी वाढली आहे.

येत्या दोन ते तीन दिवस ही थंडी काही प्रमाणात राहणार आहे. त्यानंतर थंडी कमी होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर,नाशिक,जळगाव भागांत बऱ्यापैकी थंडी आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रात थंडी किचित कमी आहे. कोकण,मराठवाडा व विदर्भातही काही प्रमाणात थंडी आहे. त्यामुळे राज्यात कमीत कमी तापमानाचा पारा ११ ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com