Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रउद्यापासून राज्यात पावसाची 'सुट्टी' मात्र...

उद्यापासून राज्यात पावसाची ‘सुट्टी’ मात्र…

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्यात परतीच्या पावसाने (Rain) थैमान घातले आहे. परतीचा पाऊस आजपर्यंत असण्याची शक्यता आहे. उद्यापासून राज्यात उघडीपीची शक्यता आहे, अशी माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी व्यक्त केले आहे…

- Advertisement -

गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, लातूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज होता. त्याप्रमाणे मागील दोन ते तीन दिवस पाऊस झाला आहे.

आता शनिवारपासून राज्यात ढगाळ वातावरण जरी असले तरी संपूर्ण महाराष्ट्रात उघडीपच जाणवेल. मात्र कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागांमध्ये विदर्भ, मराठवाड्यासह मुसळधार पाऊस होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

दिवाळी दरम्यान साधारण 20 ते 24 ऑक्टोबर दरम्यान राज्यात किरकोळ पावसाची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. रब्बी हंगामाच्या शेवटच्या आवर्तनातील किरकोळ पाऊस पडणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या