Photo Gallery : शिवकालीन शस्त्रे, युद्धकलांतून उलगडला इतिहास

Photo Gallery : शिवकालीन शस्त्रे, युद्धकलांतून उलगडला इतिहास

नाशिक । प्रतिनिधी Nashik

भाले, पट्टे, चिलखत, वाघ नखे, विळे, खुरपे, कट्यारी व ढाली शिवकालिन शस्त्रे प्रदर्शनी त्याचबरोबर युद्धशास्र कला आदींचे सादरीकरण नाशिकच्या गोदाकाठावर करण्यात आले. ऐतिहासिक युद्धकला आणि शस्रासांचा याची देही याची डोळा अनुभव नाशिककरांनी घेतला.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने नाशिक महानगर पालिका व नववर्ष स्वागत यात्रा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सलग पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आजच्या चौथ्या दिवशी शिवकालीन शस्त्रे प्रदर्शनाचेआयोजन करण्यात आले होते. छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त शिवकालीन शस्त्र विद्या व भारतीय व्यायामांचे प्रात्यक्षिके सायंकाळी सहा वाजता आणि शिवकालिन शस्त्रे प्रदर्शनात सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत पाडवा पटांगण गोदाघाटावर मांडण्यात आली होती.

या शस्त्र प्रदर्शनात भाल्यांचे विविध प्रकार, पट्ट्यांचे विविध प्रकार, तलवारींचे विविध प्रकार, कुर्‍हाडीचे विविध प्रकार, चिलखत, वाघ नखे, विळे, खुरपे, कट्यारी व ढाली हे प्रदर्शनात मांडण्यात आले होते. या शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी 9 वाजता पार पडले. तर सायंकाळी सहा वाजता, महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यानंतर ङ्गभारतीय व्यायाम आणि प्रात्याक्षिकेफ ही कोल्हापूर येथील सव्यसाची गुरुकुलाचे लखन जाधव गुरुजी आणि त्यांचे विद्यार्थ्यांनी सादर केली. त्यानंतर भारतीय व्यायाम पद्धतीचे सादरीकरण सुरु झाले, त्यात सुरुवातीला सर्वांगसुंदर व्यायाम, सूर्यनमस्कार, भूमीनमस्कार, चंद्रनमस्कार, भारतीय दंड - बैठक सादर करण्यात आली त्यानंतर शस्त्र विद्येच्या प्रत्याक्षिकांमध्ये भारतीय युद्धशास्त्र भूमिका, युद्धकला प्रात्यक्षिके व समारोप भूमिका सादर करण्यात आली.

उद्या स्वागतयात्रा

चैत्र शुद्ध प्रतिपदा श्री शालीवाहन शके 1945, शोभन संवत्सरारंभ म्हणजेच गुढीपाडवा हिंदू नववर्ष या मंगल पर्वाचे भव्य स्वागत करण्यासाठी नाशिक मधून श्री साक्षी गणपती मंदिर, भद्रकाली कारंजा, श्री काळाराम मंदिर, पूर्व दरवाजा आणि कौशल्यानगर रामवाडी या तीन ठिकाणावरून उद्या सकाळी 6.31 मि. नववर्ष स्वागत यात्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या तीनही यात्रांचा समारोप पाडवा पटांगण, दुतोंड्या मारुती शेजारी, गोदाघाट येथे संपन्न होणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com