... तर, आम्ही स्वतंत्र लढू; 'या' नेत्याने भाजपला दिला थेट इशारा

... तर, आम्ही स्वतंत्र लढू; 'या' नेत्याने भाजपला दिला थेट इशारा

मुंबई | Mumbai

आगामी विधानसभा (Assembly) निवडणुकीत भाजप २४० जागा लढणार असून, शिंदे गटाकडे ५० हून अधिक जागा लढण्यासाठी नेतेच नाहीत, असे म्हणत शिंदे गटाला ४८ जागा देणार आहोत, असं वक्तव्य पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP state president Chandrasekhar Bawankule) यांनी केले होते केलं होतं.

यामुळे भाजप (BJP) आणि शिवसेनेत जागा वाटपावरून ठिणगी पडली असतानाच राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनीसुद्धा आगामी निवडणुकांमध्ये वेगळी चूल मांडण्याचे संकेत युतीला दिले आहेत. जानकर म्हणाले, आम्हाला घेतल्याशिवाय जर शिवसेना-भाजपने जागावाटप केलं असेल तर, आम्हीसुद्धा स्वतंत्र लढण्यास तयार आहोत.

लोकसभेच्या महाराष्ट्रातील 48 जागा आम्ही लढवू, असा इशाराही महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी दिला आहे. पालघरमध्ये बोलत असताना त्यांनी याविषयी आपले मत व्यक्त केले. भाजपला जर आमची गरज वाटत असेल तर त्यांनी सोबत घ्यावं अथवा आम्ही त्यांच्यावर अवलंबून नाही. आम्हीही आमची ताकद दाखवून देऊ असे स्पष्टरित्या जानकर म्हणाले.

... तर, आम्ही स्वतंत्र लढू; 'या' नेत्याने भाजपला दिला थेट इशारा
प्रवाशी बसचा भीषण अपघात, १९ ठार; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

त्याबरोबरच येत्या विधानसभेसाठी (vidhansabha) आपणही काही जागांची मागणी केली असून, त्यावर भाजप काय निर्णय घेते हे येत्या काळात स्पष्ट होईल.

... तर, आम्ही स्वतंत्र लढू; 'या' नेत्याने भाजपला दिला थेट इशारा
नामांतराच्या समर्थनार्थ छत्रपती संभाजीनगर मध्ये हिंदू संघटनांचा मोर्चा

"महाराष्ट्रात रासपचे आतापर्यंत चार आमदार (MLA) झाले. आता आम्ही दोन आमदार आहोत. मी विधान परिषदेचा सदस्य आहे. राज्यातील 98 जिल्हा परिषदा आमच्याकडे आहेत.

आसाम आणि कर्नाटकात एक जिल्हा परिषद आमच्या ताब्यात आहे. गुजरातमध्ये रासपचे 28 नगरसेवक आहेत. चार राज्यात रासपला मान्यता मिळाली आहे. तरीही भाजपला आमची गरज वाटत नसेल तर आम्ही स्वतंत्र लढणार आहोत,"

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

त्यांना आमचा प्रस्ताव मान्य नसेल आणि फक्त शिंदे गटासोबतच त्यांना जायचे असेल तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत असे म्हणत महादेव जानकर यांनी भाजपला थेट इशारा दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com