सर्वोच्च न्यायालयाचा सवाल : तिसऱ्या लाटेत मुले संक्रमित झाली तर आई-वडील काय करणार?

jalgaon-digital
2 Min Read

नवी दिल्ली

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता केंद्र सरकारकडून व्यक्त केली गेली. यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाने तिसऱ्या लाटेसंदर्भात चिंता व्यक्त केली. सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकाराला सांगितले की, येत्या काही दिवसांत वैज्ञानिकांकडून कोरोना महामारीची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, त्यामध्ये मुले मोठ्या प्रमाणावर संक्रमित होऊ शकतात. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जर लहान मुले आली तर त्यांच्या आई-वडिलांनी काय करावे? रुग्णालयातच ते रहातील की ते काय करतील? यावर तुमची योजना काय आहे? मुलांचे लसीकरण केले पाहिजे? असे प्रश्न उपस्थित केले आहेत.

महत्वाची बातमी : मुलांसाठी या लसीला मिळाली मंजुरी

देशात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड आणि अत्यावश्यक औषधांची कमतरता भासत आहेत. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले की, आम्ही केंद्राची चूक असल्याचे म्हणत नाही, आम्हाला असे वाटते की, वैज्ञानिक दृष्टिकोनातून तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची गरज आहे. रूग्णालयांकडे ऑक्सिजन पुरवठा करण्याची क्षमता आहे का? तसेच ऑक्सिजनच्या पुरवठ्यात कोठे अडचणी येत आहेत काय? बाधिंताची संख्या वाढली तर तुम्ही काय कराल? आरोग्य यंत्रणा पूर्णपणे थकलेली आहे. अशावेळी चांगल्या आरोग्य सुविधा कशा मिळतील? असे प्रश्न उपस्थित केले.

देशात एक लाख डॉक्टर आणि अडीच लाख परिचारिकांचे पद रिक्त आहेत. ते कोरोनाच्या या परिस्थितीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. दुसरीकडे, एक लाख डॉक्टर एनईईटी परीक्षेच्या प्रतीक्षेत आहेत. यापरिस्थितीत आपल्याकडे (केंद्र सरकार) काय आहे? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *