महिला सुरक्षेकडे लक्ष देणारा नगरसेवक हवा

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

प्रभागाचा नगरसेवक (Corporator) अभ्यासू पाहिजे. तसेच स्वच्छ चरित्राचा (clean character) नगरसेवक पाहिजे. प्रभागात विशेष लक्ष केंद्रित करणारा, सतत संपर्कात राहणारा, प्रभागात वेळ देणारा, सर्व जाती धर्मांच्या लोकांना बरोबर घेऊन चालणारा, विविध सामाजिक उपक्रम करून लोकांमध्ये जागृती करणारा, चांगल्या आरोग्य सुविधा (Health facilities) उपलब्ध करून देणारा, शिक्षित (Educated), तरुण (yong) नगरसेवक असला पाहिजे. शिक्षणाकडे विशेष लक्ष देतानाच महिला सुरक्षेकडे देखील लक्ष देणारा नगरसेवक हवा.

– डॉ. सादिक शेख

प्रभागातील नागरिकांच्या समस्यांबद्दल महासभा (mahasabha) तसेच महापालिकेच्या स्थायी समिती सभेत (Municipal Standing Committee Meetings) आवाज उठवणारा, जनतेचे प्रश्न मार्गी लावणारा, अभ्यासू तसेच मुद्देशीर बोलणारा, नागरिकांची बाजू भक्कमपणे मांडून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणारा नगरसेवक हवा. प्रभागात चौफेर विकास कामे (Development works) करतांना समतोल विकास करणारा व प्रभागात विकास गंगा आणणारा नगरसेवक हवा. महापालिकेचा कारभार करतांना शासनाच्या चुकीच्या कामांना विरोध करणारा तसेच शासनाच्या विविध चांगल्या योजनांचा लाभ लोकांना मिळवून देणारा नगरसेवक हवा.

– कामरान सय्यद

नगरसेवक हा सतत पाच वर्ष नागरिकांसाठी उपलब्ध असणारा, चांगले काम करणारा, लोकांमध्ये मिळून मिसळून राहणारा तरुण तडफदार हवा. लोकांचे प्रश्न समजून त्याची सोडवणूक करणारा नगरसेवक हवा. विकास कामांबरोबरच इतर सर्व कामे वेळेवर पूर्ण करणारा, फक्त निवडणुकीच्या वेळी लोकांमध्ये न दिसणारा, कायम लोकांमध्ये मिळून राहणारा नगरसेवक हवा. प्रभागात मूलभूत सुविधा देतानाच प्रभागातील बेरोजगारी दूर करण्यावर लक्ष देणारा, महिला सुरक्षा, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी कामे करणारा नगरसेवक हवा.

– हाजी फराज मंसुरी

नगरसेवकाने प्रभागातील लोकांच्या समस्या ऐकून त्यांच्या तक्रारी मार्गी लावून संकट काळात साथ देणारा नगरसेवक हवा. करोना काळात अनेक नगरसेवक गायब झाले होते. काहींच्या गाड्यांचे काच देखील खाली होत नव्हते असा नगरसेवक नसावा. प्रभागातील गोरगरीब तसेच सर्वसामान्य जनतेच्या हाकेला उत्तर देणारा, संकटाच्या काळात साथ देणारा, मदत करणारा, चांगल्या आरोग्य सुविधा देणारा शिक्षित, तरुण तडफदार तसेच महासभेत बोलणारा नगरसेवक हवा. लोकांच्या संपर्कात राहून त्यांच्या अडीअडचणी त्वरित सोडवणूक करण्याची धमक त्याच्यात असावी.

– सलमान काजी

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *