Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याआमच्याकडे शिवसैनिकांच्या निष्ठेचे खोके - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिंदे गटाला...

आमच्याकडे शिवसैनिकांच्या निष्ठेचे खोके – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिंदे गटाला टोला

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

राज्यात सध्या खोक्यांची चर्चा रंगली आहे. आमच्याकडेही खोकेच्या खोके भरून येत आहेत. पण हे शिवसैनिकांच्या ( Shivsainiks) निष्ठेचे खोके आहेत, त्यांचे खोके वेगळे आहेत,’ असा सणसणीत टोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिंदे गटाला लागवला. प्रतिज्ञापत्राच्या स्वरूपातील या निष्ठेच्या कागदपत्रांचे खोके असेच भरभरून येऊ द्यात. हे आताच्या घडीचे सगळ्यात आवश्यक काम आहे,’ असेही त्यांनी शिवसैनिकांना केले.

- Advertisement -

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray)यांच्या आवाहनानुसार पदाधिकार्‍यांची प्रतिज्ञापत्रे आणि शिवसेना सदस्य नोंदणीच्या अर्जांचे गठ्ठेच्या गठ्ठे घेऊन शिवसैनिक मातोश्री तसेच शिवसेनाभवन येथे येत आहेत. आजही सांगलीतून पायी चालत आलेल्या शिवसैनिकांनी या प्रतिज्ञापत्रांचे खोकेच्या खोके मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केले. त्यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, आपल्याकडे पाच खोके आले आहेत. पण फक्त पाच खोके नॉट ओके. पाच, दहा, पंचवीस असे निष्ठेचे खोके भरभरून यायला हवेत. या माझ्या शिवसैनिकांच्या निष्ठा आहेत, त्या निष्ठेचा मी आदरपूर्वक स्वीकार करतो.

तुम्ही मातोश्रीवर ही कागदपत्रे घेऊन आला आहात. पण तुमच्या भागात त्यांच्या धंदेवाईक एजन्सी काम करीत आहेत. पैशाच्या माध्यमातून त्यांचे काम सुरू आहे. माझ्याकडे तसे नाही, माझ्याकडे रक्तामांसाचे जीवाला जीव देणारे सोबती आहेत. प्रतिज्ञापत्र, सदस्य नोंदणीचे जी कागदपत्रे घेऊन आला आहात, हा आपला पहिला टप्पा आहे. पुढील टप्प्यात आणखी प्रतिज्ञापत्र गोळा करायची आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना उपनेते नितीन बानगुडे-पाटील, सांगलीहून सुमारे २ हजार प्रतिज्ञापत्रांचे खोके पायी चालत येऊन येणारे शिवसैनिक अजय पाटील, अक्षय गुरुड यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

गद्दारांना कधी धडा शिकवतोय याची जनता वाट बाघतेय

कोर्टात उद्या जे व्हायचे ते होईल, माझा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे. जनतेच्या भावना आपल्या सोबत आहेत. निवडणुका कधी येताहेत आणि गद्दारांना धडा कधी शिकवतोय, याची लोक वाट बघताहेत. पण निवडणुका लवकर घेण्याची त्यांच्यात हिंमत आहे असे मला तरी वाटत नाही, अशा शब्दांत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले. यावेळी शिवसेना उपनेते नितीन बानगुडे-पाटील, सांगलीहून सुमारे २ हजार प्रतिज्ञापत्रांचे खोके पायी चालत येऊन येणारे शिवसैनिक अजय पाटील, अक्षय गुरुड यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात उद्या काहीही होवो. माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. जनताही माझ्यासोबत आहे. जनता आता वाट बघते आहे की निवडणुका कधी येतात आणि या गद्दारांना कधी धडा शिकवतो. मात्र त्‍यांच्यात निवडणुका लवकर घेण्याची हिंमत नाही, अशी टीकाही ठाकरे यांनी केली.

विधिमंडळाचे सभागृह हे जनतेचे आशास्थान आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गो-हे यांनी मंत्र्यांना सुनावले आहेच. पण उद्या कोणीही मुख्यमंत्री जरी तसे वागले तर त्‍यांचेही कान उघडण्याचे काम करावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गो-हे यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन आज ठाकरे यांच्या हस्‍ते झाले. त्‍यावेळी त्यांनी गो-हे यांचे कौतुक केले. ते म्‍हणाले, नीलम गो-हे या मूळच्या शिवसैनिक नाहीत. त्‍या वेगळया विचारांच्या होत्‍या. एक चळवळीतील महिला कार्यकर्ता अशी त्‍यांची ओळख होती. त्‍या एके दिवशी मला येऊन भेटल्‍या. दोन-अडीच तास विविध प्रश्नांवर त्‍यांनी माझ्यासोबत चर्चा केली. दुस-या दिवशी त्‍यांनीच आपल्‍याला शिवसेनेत प्रवेश करायचा असल्‍याची इच्छा बोलून दाखवली. त्‍यानंतर आज पर्यंत वआणि भविष्‍यातही त्‍या शिवसेनेसोबत असतील.

यवतमाळ असो वा भंडारा,कोठेवाडी, सर्वच ठिकाणी ज्‍यावेळी अत्‍याचाराच्या घटना घडतात त्‍यावेळी त्‍या तिथे पोहोचतात. मुळात महिला अत्याचार विषयक घटनांकडे पाहताना कोणत्‍याही धार्मिक वा राजकीय दृष्‍टीकोनातून त्‍याकडे पाहिले जाऊ नये. कोणत्‍याही पक्षाचा कार्यकर्ता जर त्‍यात सहभागी असेल तर सर्वच पक्षांनी एकत्र येऊन त्‍याविरोधात आवाज उठवायला हवा. तो आमच्या पक्षाचा म्‍हणून समोरच्यांनी आवाज उठवायचा. तुमच्या पक्षाचा म्‍हणून आम्‍ही आवाज उठवायचा हा कोडगेपणा झाला. सर्वपक्षीय महिला कार्यकर्त्यांनी असे प्रश्न धसास लावायला हवे ,असेही उद्धव ठाकरे म्‍हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या