Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याउद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास - शरद पवार

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास – शरद पवार

नवी दिल्ली । New Delhi

एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास सरकार (mahavikas aaghadi) अडचणीत आले आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (Congress & NCP) या पक्षांच्या भूमिकेकडेही लक्ष लागून आहे. राज्यात राजकीय वातावरण तापलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) दिल्लीत (Delhi) दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

- Advertisement -

यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या (uddhav Thackeray) नेतृत्वावर आपल्याला विश्वास असून गुवाहाटीला (Guwahati) गेलेले आमदार परत येतील. तसेच आमचा पूर्ण पाठिंबा उद्धव ठाकरेंना असून मला विश्वास आहे की त्यांचे जे आमदार आसामला (Assam) गेले आहेत, ते जेव्हा परत येतील. त्यांच्यासोबत बैठक होईल तेव्हा ही गोष्ट स्पष्ट होईल की उद्धव ठाकरे हे सरकार चालवू शकतात” असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

पुढे ते म्हणाले की, एक गोष्ट खरी आहे की एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या लोकांनी नव्या युतीबाबत चर्चा केली आहे. मात्र आमच्या मित्रपक्षाचे नेते आम्हाला भेटले होते. या सरकारला आमचे पूर्ण पाठबळ असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आमचा त्यांना पाठिंबा आहे.आम्हाला ही तोच कायम ठेवायचा आहे. तसेच राज्य सरकारला कुठलाही धोका नसून शिवसेनेचा एक गट आसाममध्ये गेला आहे, त्यांच्याकडून ज्या प्रतिक्रिया येत आहेत. यावरुन एकनाथ शिंदे गटाला सत्तापरिवर्तन हवे आहे, यासाठीच ते प्रयत्न करत असल्याचे पवारांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले की, बंडखोरांनी गुजरात (Gujarat) आणि आसाम राज्य निवडले आहे. शिंदे यांच्याकडे संख्याबळ आहे, तर मग ते गुहावाटीला जाऊन का बसले आहेत, मुंबईत का येत नाहीत?, असा सवाल शरद पवार यांनी केला आहे. तसेच दोन्ही राज्य भाजपच्या ताब्यात आहेत. शिंदे काल म्हणाले, पॉवरफुल्ल शक्तीचा आपल्याला पाठिंबा आहे. मग ती पॉवरफुल्ल शक्ती नक्की कोण?, हे मी सांगण्याची गरज नाही, असे म्हणत त्यांनी भाजप यात सामील असल्याचे विधान केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या