इम्रान खानची कबुली : पाकिस्तान कंगाल

इम्रान खानची कबुली : पाकिस्तान कंगाल
इम्रान खान

पाकिस्तानचे प्रधानमंत्री इमरान खानने (Imran Khan) देश दिवाळखोर झाला असल्याचे शेवटी मान्य केले. देश चालवण्यासाठी पैसे नसल्यामुळे दुसऱ्या देशांकडून कर्ज घेऊन कामकाज करावे लागत असल्याचे इम्रान खान (Imran Khan) यांनी स्पष्ट केले.

मंगळवारी एका कार्यक्रमात इम्रान खान म्हणाले की, देशात कराच्या माध्यमातून मिळणारा महसूल कमी झाला आहे. यामुळे विदेशांकडे झोळी फैलावी लागत आहे. सरकारकडे लोककल्याणकारी कार्यक्रमासाठी पैसा नाही.

इम्रान खान
तारक मेहतामधील रीटा रिपोर्टने केले दुसरे लग्न

फेडरल बोर्ड ऑफ रिव्हेन्यू (FBR) च्या ट्रॅक ऍण्ड ट्रेस सिस्टम (TTS) चे उद्घाटन कार्यक्रमात हुए इमरान खान (Imran Khan) म्हणाले, ‘आमच्या देशातील सर्वात मोठी समस्या देश चालवण्यासाठी पैसा नाही. यामुळे कर्ज घ्यावे लागते. जनताची कर देण्याची प्रवृत्ती नाही. TTS प्रणाली तंबाकू, साखर व सीमेंट सह अन्य महत्वपूर्ण क्षेत्रातील उत्पादन व विक्रीवर देखरेख ठेवले. यामुळे देशातील महसूल वाढण्याची अपेक्षा आहे. जर नागरिकांनी प्रामाणिकपणे करांचा भरणा केला तर देश अजूनही दिवाळखोरीतून बाहेर येऊ शकतो, असे इम्रान म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com