निवडणुकांसाठी आम्ही तयार; शरद पवारांचे नाशकात वक्तव्य

शरद पवार
शरद पवार

नाशिक | प्रतिनिधी Nashik

राज्यात केव्हाही निवडणुका (Election) लागल्या तरी आम्ही तयार आहोत असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी केले. पवार आज दुपारी नाशिक दौऱ्यावर आले आहेत. एका हॉटेलमध्ये त्यांनी माध्यमांशी दुपारी तीन वाजता संवाद साधला. (Press Conference) याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हेदेखील उपस्थित होते...

राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आजपासूनच महाराष्ट्र दौऱ्यावर जात आहेत. नाशिकपासून त्यांचा दौरा सुरु होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री राज्यात दौरा करत आहेत हे चांगलंच असल्याचे पवार याप्रसंगी म्हणाले.

दुसरीकडे, ओबीसीबाबत न्यायालयाने जो निर्णय दिला आहे. त्यावर फेरविचार याचिका राज्य सरकारने दाखल करावी अशी मागणी याप्रसंगी छगन भुजबळ (MLA Chhagan Bhujbal) यांनी केले.

ते म्हणाले, ओबीसीवरील आरक्षणाच्या बाबत जो काही निर्णय कोर्टाने दिला आहे. याबाबत आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो असल्याचे त्यांनी सांगितले. भुजबळ यांनी कोर्टाच्या निर्णयानंतर तात्काळ प्रतिक्रिया जेव्हा दिली होती त्यावेळीदेखील त्यांची हीच मागणी होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com