आम्हीच नंबर वन

जिल्हाध्यक्षांचे दावे-प्रतिदावे; गुलालाची प्रचंड उधळण
आम्हीच नंबर वन

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जळगाव तालुक्यासह जिल्हयात आज ग्रामपंचायत निवडणूक (Gram Panchayat Elections) निकाल (result) आज जाहीर झाले. या निकालात विजयी उमेदवारांनी प्रचंड जल्लोष केला. तर पराभूत झालेल्या उमेदवारांच्या चेहर्‍यावर नाराजी दिसून आली. यंदाच्या निकालात तरूणांसह महिला उमेदवारांनी मोठी बाजी मारली आहे. दरम्यान जिल्ह्यात आम्हीच नंबर वन असल्याचे दावे राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांकडून करण्यात आले आहे.

.

जिल्ह्यातील 140 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली होती. यात 18 ग्रामपंचायती आधीच बिनविरोध झाल्याने 122 ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष मतदान झाले होते. या मतदानाची आज तालुकास्तरावर मतमोजणी करण्यात आली. सकाळी 10 वाजेपासून सर्वच तालुक्यांवर मतमोजणीला सुरूवात झाली. मतमोजणी ठिकाणी विजयानंतर अनेकांनी विजयांचा जल्लोष केला, गुलालाची प्रचंड उधळण, पूष्पहार घालून मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. विजयांची काहींचे चेहरे आनंदले तर काहींच्या पदरी निराशा पडली. विजयी झालेल्यामध्ये युवक, महिलांची समावेश आहे. जिल्हयात 140 ग्रामपंचायतीवर लोकनियूक्ती सरपंचाची निवड झाली आहे.

जळगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निकालाची मतमोजणी शहरातील नुतन मराठा महाविद्यालयाच्या सभागृहात झाली. उमेदवारांच्या प्रतीनिधीसमोर अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, तहसिलदार नामदेव पाटील यांच्या निगराणी खाली स्ट्राँगरूममधील मतपेट्या मोजणीसाठी मतमोजणी टेबलावर आणण्यात आल्या.

सकाळी 10 वा. मतमोजणी सुरू झाली. उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी मतमोजणी टेबलासमोर होते. जसजशी मतमोजणी होत होती तसतसे ते बाहेर आपल्या उमेदवार, समर्थकांना मतदानाची माहिती देत होते. तसतसा बाहेरील समर्थकांचा जल्लोष वाढत होता. काहींनी ढोल ताशांच्या गजरात मिरवणूकाही काढल्या. गुलालाची उधळण केल्याने सर्वांचेच चेहरे गुलालाने माखले होते. विजयी झाल्यानंतर विजयी उमेदवारांनी त्यांच्या गावात जल्लोष केल्याचे चित्र दिसून आले. शहरातील जिल्हा क्रीडा संकूलाकडील रस्ता पोलिसांनी बॅरिकेटस टाकून बंद करण्यात आला होता

जळगाव ग्रामीणमध्ये 19 पैकी 16 ग्रा.पं.वर शिंदे गटाचे वर्चस्व

जळगाव व धरणगाव तालुक्यातील 19 ग्रामपंचायतीसाठीची निवडणूक नुकतीच पार पडली. 19 पैकी 2 ग्राम पंचायती याआधीच बिनविरोध झाल्यामुळे मंगळवारी 17 ग्राम पंचायतीचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये जळगाव तालुक्यातील 12 पैकी 10 तर धरणगाव तालुक्यातील 7 अशा 6 अश्या 19 पैकी 16 ग्राम पंचायतीमधील जनतेने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर आपला विश्वास कायम ठेवत, बाळासाहेबांची शिवसेनेच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना बाळासाहेबांची शिवसेनेचे गावकारभारी निवडून आणण्यात 100 टक्के यश आले आहे. 19 ग्राम पंचायतीच्या निवडणुकी 16 ग्राम पंचायतीमध्ये आता बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सरपंच विराजमान होणार आहेत. सरपंचासोबतच धरणगाव तालुक्यातील 51 ग्रामपंचायत सदस्यांपैक्य तब्बल 42 ग्रां.पं. सदस्य तर जळगाव तालुक्यातील 92 पैकी 83 ग्रा. पं. सदस्य आसे एकूण 143 ग्रा.पं, सदस्यांपैक्य तब्बल 125 सदस्यांनी देखील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पाठींबा दिला आहे.

महाविकास आघाडीचा 80 ग्रा.पं.वर झेंडा ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल हे भाजपा आणि शिंदे गटासाठी धोक्याची घंटी आहे. राज्यातील जनता महागाई, बेरोजगारी, हमीभाव, नुकसान भरपाई या विषयांवरून प्रचंड नाराज आहे. ही नाराजी ग्रामपंचायतीच्या निकालातून दिसून आली आहे. महाविकास आघाडी सरकारने मागील अडीच वर्षाच्या काळात केलेल्या कामांवर जनतेने विश्वास दाखविला असून मविआने 80 ग्रामपंचायतींवर झेंडा फडकविल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांनी दिली.

रवींद्र पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष

बाळासाहेबांच्या शिवसेनेला मोठे यश जळगाव ग्रामीणमधील 17 पैकी 16 ग्राम पंचायतींवर शिवसेना शिंदे गटाने आपले वर्चस्व सिध्द केले आहे. केवळ जळगाव ग्रामीणमध्येच नाही तर संपुर्ण जिल्ह्यातील बर्‍याच ग्रामपंचायतींमध्ये शिवसेना शिंदे गटाने यश मिळवले आहे. पक्ष कोणताही असो, मात्र पालकमंत्री म्हणून प्रत्येक गावाचा विकास करणे, त्या-त्या गावांमध्ये शासनाच्या योजना राबविणे यावर आमचा भर होता, आणि भविष्यातही राहिल अशी प्रतिक्रिया पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.

ना. गुलाबराव पाटील पालकमंत्री शिवसेना शिंदे गट

भाजपा-शिंदे गटाचे 100 ग्रा.पं.वर वर्चस्व ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात विकासाचे प्रतिबिंब दिसले आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने शेतकरी, कामगार, सर्वसामान्य नागरिकांसाठी अल्पावधीतच चांगले निर्णय घेतले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेने विकासालाच कौल दिला आहे. जिल्ह्यातील 140 पैकी भाजपा 77 आणि शिंदे गट 23 अशा एकूण 100 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविले असल्याचा दावा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांनी केला आहे.

आ. राजूमामा भोळे भाजपाचे जिल्हाध्यक्ष

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com