'या' जलशध्दीकरण केंद्रांचा होणार कायापालट

केंद्र शासनाकडे कोट्यावधींचा प्रस्ताव सादर
'या' जलशध्दीकरण केंद्रांचा होणार कायापालट

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहराच्या मलजल शुद्धीकरणाच्या कामाला गती देण्यात येत असून केंद्र शासनाकडे (central government) सिंहस्थपूर्वी जलशुद्धीकरणासाठीच्या (Water purification) सिवरेज ट्रीटमेंट प्रकल्पाचे (Sewage Treatment Project) 530 कोटी रुपयांचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

शहरातून सुमारे 355 ते 360 एमएलडी जलमल युक्त दूषित पाणी प्रक्रिया केंद्रात (MLD sewage treatment plant) वाहून नेले जाते या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी पूर्वी उभारण्यात आलेल्या चार प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) व अमृत योजनेत नव्याने उभारण्यात आलेले दोन अशा सहा एसटीपी (SPT) च्या माध्यमातून जलशुद्धीकरण (water purification) केले जाते. मात्र केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (Central Pollution Control Board) व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (State Pollution Control Board) माध्यमातून सांडपाण्यावर प्रक्रिया करुन पून्हा नदीत सोडल्या जाणार्‍या पाण्याबाबत कडक नियमावली तयार करण्यात आलेली आहे.

त्यासाठी एसटीपी (STP) मधून बाहेर पडणार्‍या पाण्यासाठी गुणवत्ता प्रमाणही नव्याने निश्चित करण्यात आले आहे त्यामुळे नाशिक महानगरपालिकेला (Nashik Municipal Corporation) सिंहस्थापूर्वी कालबाह्य नियोजनातून या चार प्रकल्पांंचे नूतनीकरण करणे गरजेचे झाले आहे. या प्रक्रिया केंद्रात प्रामुख्याने तपोवन, आगर टाकळी, चेहडी व पंचक या केंद्रांंचा समावेश आहे.

सद्यस्थितीत या केंद्राच्या माध्यमातून नदीत सोडले जाणारे पाण्याची गुणवत्ता 20 बीओडी ते 30 बीओडी एवढी आहे. या व्यतिरिक्त 2012 नंतर अमृत योजनेत उभारण्यात आलेल्या पिंपळगाव खांब (Pimpalgaon Khamb) व गंगापूर (gangapur) या दोन प्रकल्पांतून बाहेर सोडल्या जाणार्‍या पाण्याचा बीओडी हा 5 आहे. त्यामुळे शहरातील चार जुन्या एसटीपी चे नूतनीकरण करणे गरजेचे झालेले आहे

त्या दृष्टीने केंद्र सरकारकडे नदी संवर्धन उपक्रमांतर्गत (River Enhancement Undertaking) 530 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून, त्या माध्यमातून लवकरच या एसटीपच्या गुणवत्तेत सूधारणा प्रक्रिया गतिमान केली जाणार आहे. नदीपात्रात बर्‍याच ठिकाणी पाण्याला फेस येताना दिसून येतो त्यासाठी वापरल्या जाणार्‍या एसबीआर या नवीन प्रणालीचा अवलंब केला जाणार असल्याचे समजते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com