नवीन नाशिक विभागात 'या' दिवशी राहणार पाणीपुरवठा बंद

नवीन नाशिक विभागात 'या' दिवशी राहणार पाणीपुरवठा बंद

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महानगरपालिका (Nashik Municipal Corporation) हद्दीतील शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्र (Water Treatment Plant) येथून प्रभाग क्रमांक 27, 25, 26( भागश:) मधील जलकुंभ भरणे आणि पाणी वितरणाकरीता (water supply) 900 मिमी व्यासाच्या पीएससी जलवाहिनीद्वारे (PSC Aqueduct) पाणीपुरवठा करण्यात येतो.

अंबड जवळ 900 मिमी व्यासाच्या जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. सदरचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने नवीन नाशिक विभागात (New Nashik Division) बुधवारी (दि.1) सकाळ, दुपार आणि संध्याकाळचा पाणीपुरवठा (water supply) होऊ शकणार नाही. तसेच गुरुवारी (दि.2) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याने नागरीकांनी काळजी घेण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या (Water Supply Department) कार्यकारी अभियंत्यानी केले आहे.

नविन नाशिक भागात बुधवारी पाणी पूरवठा बंद राहणार आहे. त्यात प्रामुख्याने प्र.क्र.24 कालिका पार्क उंटवाडी परिसर, प्र.क्र.25 इंद्रनगरी पवन नगर, माऊली लॉन्स सावता नगर, त्रिमूर्ती चौक, कोकण भवन परिसर, कामटवाडे गाव व परिसर,प्र.क्र. 26 मोगल नगर, साळुंके नगर, वावरे नगर, शिवशक्ती नगर व चौक, आयटीआय परिसर, खुटवड नगर, मटाले नगर, आशीर्वाद नगर, संजीव नगर,

जाधव संकुल पाटील, पार्क विरार संकुल, प्र.क्र. 27 अलीबाबा नगर, दातीर वस्ती, अंबडगाव, हुजेफा फर्निचर, ग्लोबल शाळा व परिसर, प्र.क्र.28 लक्ष्मी नगर, अंबड गाव ते माऊली वृंदावन नगर, माऊली लॉन्स परिसर, अंबड गाव परिसर, लॉन्स साई, ग्रामनगर, उपेंद्र नगर, महाजन नगर, सहावी स्कीम, प्र. क्र. 29 भाद्रपद सेक्टर, आझाद पंछी परिसर, शनी मंदिर परिसर, मोरवाडी गाव व इतर परिसरात पाणी पूरवठा बंद राहणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com