वाळीपाडा ग्रामस्थांना आजपासून पाणीपुरवठा

वाळीपाडा ग्रामस्थांना आजपासून पाणीपुरवठा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सोशल नेटवर्किंग फोरमचे ( Social Networking Forum )कष्ट आणि त्यांना मिळालेल्या सैन्याधिकार्‍यांची तितकीच मिळालेली भक्कम साथ,यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar Taluka )अतिदुर्गम भागातील वाळीपाडा (Walipada )साडेचारशे लोकवस्तीच्या या पाड्याला आता सकाळ-संध्याकाळ गावातच पाणी उपलब्ध होणार आहे.या योजनेचा लोकार्पण सोहळा शनिवारी (दि. 21) सकाळी 10.30 वा. सैन्याधिकार्‍यांच्या हस्ते होत आहे,अशी माहिती सोशल नेटवर्किंग फोरमचे संस्थापक प्रमोद गायकवाड यांनी दिली.

सोशल नेटवर्किंग फोरमच्या कार्यातून विविध सोशल कार्यक्रम करण्यात येत आहे.हाच ध्यास घेतलेल्या फोरमने तीन वर्षांपूर्वी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाळीपाडा जलयोजना हाती घेतली.अतिशय दुर्गम भागात असलेल्या वाळीपाडा हा साडेचारशे लोकवस्तीचा हा पाडा आहे.येथील ग्रामस्थांना उन्हाळा व हिवाळ्यात दीड किलोमीटरवर असलेल्या दमनगंगा नदीतून पाणी आणणे शक्य होते. मात्र, पावसाळ्यात ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते.

पावसाळ्यात पाणी आणता येत नसल्याने त्यांना गढूळ पाणीच प्यावे लागत होते.याबाबत ग्रामस्थांनी सोशल नेटवर्किंग फोरमकडे याबाबत आपली अडचण सांगितली. त्यावर फोरमने या गावात पाणी आणण्याचा ध्यास घेतला आणि तो आता पूर्णत्वास आला आहे. मात्र, हे काम एकट्या सोशल नेटवर्किंग फोरमने करणे शक्य नव्हते. त्यांना भारतीय सैन्य दलाच्या आर्मी,नेव्ही आणि एअर फोर्समध्ये अधिकारी असलेल्या आणि औरंगाबाद येथील एसपीआय संस्थेच्या बाराव्या माजी विद्यार्थ्यांनी आर्थिक सहकार्य केले.त्यामुळे या दुर्गम पाड्यावरील लोकांना आता दीड किलोमीटरवर असलेल्या दमनगंगा नदीतून थेट गावातच पाणी उपलब्ध होणार आहे. ही योजना आता पूर्णत्वास आल्याने महिलांना डोक्यावर हंडे घेऊन दररोज खडतर द्यावी लागणारी परीक्षा आता संपुष्टात येणार आहे.

21 व्या शतकातही एखाद्या गावाला पाण्यासाठी इतक्या हालअपेष्टा सहन कराव्या लागतात.हे कळले तेव्हा आम्हाला अतिशय वाईट वाटले.त्यामुळे सोशल नेटवर्किंग फोरमच्या प्रयत्नात आम्ही योगदान द्यायचे ठरवले.आज या गावात पाणी पोहोचल्याचा मनापासून आनंद झाला.

कर्नल अमित दळवी, संचालक एसपीआय

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com