Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यापाणी आरक्षण : नाशिक मनपाला मिळाले मागितले तितकेच पाणी

पाणी आरक्षण : नाशिक मनपाला मिळाले मागितले तितकेच पाणी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सालाबादाप्रमाणेच यंंदाही आधीचेच पाण्याचे आरक्षण कायम ठेवण्यात आले आहे. त्यात यंदा तरी बदल होईल अशी अपेक्षा होती. मात्र महापालिकेनेच ५ हजार ६०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी केल्याने गंगापूर (Gangapur) व दारणा (Darna) धरण समूहातून तेवढचे पाणी (Water) आरक्षित ठेेवण्याचा निर्णय आज पाणी आरक्षण समिती बैठकीत घेण्यात आला…

- Advertisement -

पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या उपस्थीतीत आज पाणी आरक्षण बैठक झाली. जलसंपदाच्या मुख्य अभियंता अलका अहिरराव यांनी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांकडून तसेच उद्योग व शेतीसाठी असलेेल्या पाणी मागणीची माहिती दिली.

नाशिक महापालिकेने (Nashik NMC) गंगापूर धरणातून चार हजार व दारणातून १ हजार ६०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी केल्याने त्यांंना मागणी एवढे पाणी द्यावे, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

मराठवाड्यासाठी एक्स्प्रेस कॅनॉलमधून अतिरिक्त पाणी सोडावे लागण्याचे कारण देत मुकणे धरणातील ३०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण हटविण्याचे प्रयत्न मराठावाडावासियांचे सुरू आहेत.

साधारण पावसाळा संपला की, ऑक्टोबर अखेर पुढील २९० दिवसांसाठी नाशिकला पिण्याचे पाणी शेती व उद्योेग यासाठी पाणी आरक्षित केले जाते. त्यावर पुढील वर्ष अवलंबून असते. साधारण १५ ऑगस्टपर्यंत सर्वांंना पाणी पुरेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र नाशिक दिवसेंंदिवस वाढत आहे. त्यामुळे पाण्याची मागणीदेखील वाढत आहे.

नाशिकला गंगापूर धरणातून आता ४ हजार, दारणातून १ हजार ६०० दशलक्ष घनफूट पाणी मिऴणार आहे. दरवर्षी नाशिकची पाण्याची गरज दहा ट्क्क्यांनी वाढत आहे. त्यासाठी महापालिकेने २७० कोटी रुपये मुकणेे धरणातील पाणी उचलण्यासाठी पाईपलाईनवर खर्च केले आहेत.

दरडोई दीडशे लिटर पाणी नाशिककरांना मिळावे असा प्रयत्न आहे. मात्र वाढीव मागणी का नोंदवली गेली नाही हा प्रश्न कायम राहिला आहे. बैठकीस जिल्हाधिकारी सुरज मांढरे आ. सरोज अहिरे, आ. डॉ. राहुल आहेर, आ. हिरामण खोसकर, आ. दिलीप बनकर, आ. देवयानी फरांदे आदींंसह अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या