रेल्वे स्थानक परिसरात जलशुद्धीकरण यंत्रणा

दररोज दोन लाख लिटर पाणी स्वच्छ करून पुनर्वापर होणार
रेल्वे स्थानक परिसरात जलशुद्धीकरण यंत्रणा

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

भुसावळ विभागातील महत्त्वाचे स्थानक असलेल्या नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर ( Nashikroad Railway Station सध्या एसटीपी ,जल शुद्धीकरण प्रक्रिया ( Sewage Treatment Plant )प्लांट सुरू करण्याची तयारी युद्धपातळीवर सुरू झाली आहे. रेल्वे स्थानकावर उपलब्ध असणार्‍या पाण्याचे जलशुद्धीकरण करून ते पुन्हा चारही प्लॅटफार्मच्या स्वच्छतेसाठी आणि झाडांना टाकण्यासाठी वापरले जाणार आहे. यातून पाण्याची बचत होऊन पर्यावरणालाही चालना मिळणार आहे.

नाशिकरोड रेल्वे स्टेशन हे विविध प्रकारच्या कल्याणकारी व प्रयोगशील योजना नेहमीच राबवत असते. त्यातील जलशुद्धीकरण योजना येत्या काही दिवसात कार्यान्वित होणार आहे.

रेल्वे स्थानक नाशिक महानगरपालिकेकडून पाणी घेते. हे पाणी रेल्वे स्थानकावर स्वच्छतेसाठी वापरले जाते. शिवाय झाडांना टाकण्यासाठी, प्रवाशांना पिण्यासाठी व इतर वापरासाठी पाण्याचा वापर होतो.

पाणी बचतीसाठी रेल्वेने अनोखी शक्कल लढवली असून जलशुद्धीकरण केंद्र प्लॅटफॉर्म क्रमांक चारच्या बाजूला निर्माण केले आहे. रोज दोन लाख लिटर पाणी शुद्ध करण्याची व्यवस्था एसटीपी प्लांटमध्ये करण्यात आली असून रेल्वे स्थानकावर वापरलेले पाणी शुद्ध करून ते चारही प्लॅटफॉर्म स्वच्छ करण्यासाठी आणि झाडांना टाकण्यासाठी वापरले जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com