Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याखुशखबर! वॉटर पार्क होणार सुरु; महापालिका आयुक्तांकडून कामांचा धडाका

खुशखबर! वॉटर पार्क होणार सुरु; महापालिका आयुक्तांकडून कामांचा धडाका

नाशिक | प्रतिनिधी Nashik

पांडवलेण्याच्या (Pandavleni) पायथ्याशी असलेल्या फाळके स्मारक (Phalake Smarak) शेजारील वॉटरपार्क खासगीकरणाच्या (Water park privatization) माध्यमातून लवकर सुरू होणार आहे. त्यासाठी आयुक्त रमेश पवार (NMC Commissioner ramesh pawar) यांनी संबधित विभागांना याबाबत प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले आहे. या आदेशा नंतर आता वॉटर पार्क सुरू झाल्यानंतर 20 वर्षापुवी जी प्रवेश फि होती, तीच ठेवण्याचे निर्देशही त्यांनी विभागप्रमुखांच्या बैठकित दिले. ही नाशिकरांसाठी खुशखबर ठरणार आहे…..

- Advertisement -

महापालिकेत आयुक्त तथा प्रशासक म्हणून रुजू झाल्यानंतर रमेश पवार यांनी शहर सौंदर्यीकरण तसेच पर्यटन या विषयाकडे देखील लक्ष दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून फाळके स्मारकाचे आता रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर विकास होणार आहे.

यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाने सुरू केली असून सल्लागार नियुक्ती झाल्यानंतर या ठिकाणी चित्रपटांचे शूटिंग देखील होणार आहे. यामुळे नाशिककरांना इतर भागातील पर्यटकांसाठी तो देखील एक केंद्र ठरणार आहे.

दरम्यान, वॉटर पार्क (Water park) मध्ये लाफिंग जोकर (Laughing joker), प्ले पेन शॉवर (Play pain showar), मशरूम वॉटर फॉल (mashrum water fall), स्लायडिंग पूल, क्रेझी रिव्हर, आर्टगनल स्लाइड असे विविध गेम खेळण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते.

मात्र, हा पार्क गेल्या काही वर्षापासून बंद असल्याने येथील सुविधां निकामी झाल्या आहेत. वॉटर पार्कमध्ये वॉटर स्लाईड,वेब पुल,स्विमिंग व डायव्हिंग पुल, या ठिकाणी लाफिंग जोकर, प्ले पेन शॉवर, मशरूम वॉटर फॉल, स्लायडिंग पूल, स्प्रेपार्क, सरप्राईज फाऊंटन, वेगवेगळ्या स्लाईड,क्रेझी रिव्हर, आर्टगनल स्लाइड,पाणि फिल्टरेशन व्यवस्था, चेंज रूम, लॉकर,फुड कोर्ट अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आले होते.

आता या सर्व सुविधा आता खाजगीकरणातून पुन्हा ऊपलब्ध करून देण्यात येणार असून त्यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार आहेत. वॉटर पार्क मधील सर्व सुविधा सुस्थितीत करून सुसज्जपणे वॉटरपार्क सूरू करण्याचे निर्देश जो कोणी ठेकेदार ंठेका घेणार त्याला देण्यात येणार आहेत. त्यात प्रामुख्याने या ठिकाणी वॉटरपार्कचा आनंद घेण्यासाठी येणार्‍यांसाठी 20 वर्षांपुर्वी जे प्रवेश दर होते तेच आकारण्याची महत्वाची अट असणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

फिल्मसिटी तयार होणार

चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारकाचा हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर महापालिका स्वनिधीतून पुनर्विकास करणार आहे. पार्श्वभूमीवर प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्त करणार असून, त्याकरिता स्वारस्य देकार मागवण्यात येणार आहेत. फाळके स्मारकाची दुरवस्था थांबविण्यासाठी महापालिकेने स्मारकाच्या नूतनीकरणाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मनपा आयुक्त रमेश पवार यांनी खासगीकरणाची निविदा प्रक्रिया रद्द केली. यामुळे आता महापालिका स्वतःच्या निधीतूनच स्मारकाची कामे करणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या