Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यादुतोंड्या मारुतीच्या कंबरेला लागले पाणी; दुपारनंतर विसर्ग आणखी वाढणार

दुतोंड्या मारुतीच्या कंबरेला लागले पाणी; दुपारनंतर विसर्ग आणखी वाढणार

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिकमधील गंगापूर धरणाच्या (Nashik gangapur dam water catchment area) पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असल्यामुळे गंगापूर धरणाची (Gangapur Dam) पाणीपातळी वाढली आहे….

- Advertisement -

त्यामुळे आज सकाळी अकरा वाजेपासून गंगापूर धरणातून (Gangapur Dam) पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. सुरुवातीच्या एक तासभर १ हजार ५०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग (Water Discharge) झाल्यानंतर पुढील एक तासांत हा विसर्ग दुपटीने वाढवून तीन हजार करण्यात आला आहे….

गंगापूर धरणातून (Gangapur dam) पाण्याचा विसर्ग (Water Discharge) वाढवण्यात आल्यानंतर अनेक नाशिककरांनी गोदातीरी पाऊस (Godavari river side) पाहण्यासाठी गर्दी केली आहे. पावसाच्या अनेक आठवणी अनेकांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केल्या आहे.

गंगापूर धरणातून (Gangapur Dam) पाणी सोडल्यानंतर पाणी होळकर पुलाखाली येण्यासाठी दोन तासांचा कालावधी लागतो. या अनुषंगाने नाशिककरांनी सोमेश्वर, गंगापूर गावातील (Someshwar water fall and gangapur gaon) काही जागा याठिकाणी जाऊन पावसाचा आनंद घेतला.

ठिकठिकाणी महापालिकेकडून कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाकडूनदेखील (Disaster management department) धोक्याच्या ठिकाणी लक्ष ठेवण्यात येत असून अनुचित प्रकार टाळण्यासाठी वाहत्या पाण्यात उतरू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या