Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यादारणा धरणातून 'इतक्या' क्युसेसचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

दारणा धरणातून ‘इतक्या’ क्युसेसचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या काही दिवसांपासून इगतपुरी तालुक्यात (Igatpuri Taluka) पावसाची (Rain) जोरदार बॅटिंग सुरूच आहे. पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी (Igatpuri) परिसरातील नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत…

- Advertisement -

त्यामुळे तालुक्यातील दारणा धरणाच्या (Darna Dam) पाणी साठ्यात मोठी वाढ होत आहे. दारणा धरणातून याआधी ४ हजार २८६ क्युसेस पाण्याचा विसर्ग (Water Discharged) सुरु होता. हा विसर्ग आता वाढवण्यात आला आहे.

करंजवण धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

दारणा धरणातून आज दुपारी १२ वाजता ७ हजार २४४ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. पाऊस (Rain) असाच सुरु राहिला तर पाण्याचा विसर्ग अजूनही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

…अखेर अनुराधा सिनेमागृह जमीनदोस्त; जाणून घ्या ४७ वर्षांचा इतिहास

विसर्ग वाढवण्यात आल्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळी दिंडोरी तालुक्यातील करंजवण धरणातूनदेखील (Karanjwan Dam) पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. तर गंगापूर धरणातून (Gangapur Dam) २ हजार ९८८ क्युसेस पाण्याचा होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या