Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकमधील कोणत्या धरणातून होतोय किती विसर्ग; पाहा 'इथे'

नाशिकमधील कोणत्या धरणातून होतोय किती विसर्ग; पाहा ‘इथे’

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या तीन ते चार दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस (Rain) बरसत आहे. पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने जिल्ह्यातील धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे, अनेक धरणांमधून पाण्याच्या विसर्ग (Water Discharged) होत आहे. तसेच नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत…

- Advertisement -

त्र्यंबक (Trimbak) आणि इगतपुरी (Igatpuri) तालुक्यात जोरदार पाऊस सुरु असल्याने गंगापूर धरणात (Gangapur Dam) पाण्याची मोठी आवक झाली आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून (Gangapur Dam) १० हजार ३५ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर अहिल्याबाई होळकर पुलाखालून (Ahilyabai Holkar Bridge) १३ हजार ४५ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

तसेच दारणा धरणातून (Darna Dam) 15 हजार 88 क्युसेस, कादवा धरणातून (Kadwa Dam) ६ हजार ७१२ क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. तर नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून (Nandurmadhyameshwar) जायकवाडीच्या दिशेने ४९ हजार ४८० क्युसेस विसर्ग सुरु आहे. मुकणे, वालदेवी आणि आळंदी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला नाही.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. हा पाऊस आणखी काही दिवस सुरु राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याला १४ जुलैपर्यंत रेड अलर्ट देण्यात आला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या