Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : करंजवण, पालखेडमधून मोठा विसर्ग; दोन पूल पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क...

Video : करंजवण, पालखेडमधून मोठा विसर्ग; दोन पूल पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क तुटला

ओझे | वार्ताहर | Oze

दिंडोरी तालुक्यात (Dindori Taluka) आज सकाळपासून पावसाचा (Rain) जोर वाढला असून तालुक्यातील धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्यामुळे सर्व धरणामधून पाण्याचा विसर्ग (Water Discharged) वाढविण्यात आहे…

- Advertisement -

दिंडोरी तालुक्यातील सर्वात मोठे करंजवण धरण (Karanjvan) ८१.५१ टक्के भरले असून धरणातून कादवा नदी पात्रात (Kadwa River) ११ हजार ८२५ क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग (Water Discharged) होत आहे.

यामुळे ओझे येथील कादवा नदीवरील पुल पाण्याखाली गेला असून ओझे-करंजवण या गावातील संपर्क बंद आहे. म्हेळुस्के कादवा नदीवरील पुलही पाण्याखाली गेल्यामुळे म्हेळुस्के-लखमापूर या दोन गावातील संपर्क तुटला आहे.

तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू

मांजरपाडा (देवसाणा) येथे सततच्या पावसामुळे पुणेगाव धरणातील पाणी पातळीत वाढ होत आहे. यामुळे पुणेगाव धरण ८९ टक्के इतके भरले असून धरणातून उनंदा नदी पात्रात २ हजार ५०० क्युसेस इतका विसर्ग सोडण्यात आला आहे.

तर वाघाड, तिसगाव तसेच ओझरखेड धरण जुलै महिन्यात १०० टक्के भरल्यामुळे सध्या या तिन्ही धरणाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणत पाण्याचा विसर्ग होत आहे.

गंगापूरमधून विसर्ग वाढवला; पाच वाजता सोडणार ‘इतके’ पाणी

सर्व धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पालखेड धरणाच्या जलशायात पाण्याची आवक सतत वाढत आहे. पालखेड धरण ६५ टक्के भरले असून सध्या पालखेड धरणातून कादवा नदी पात्रात १७ हजार ३६६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे तालुका प्रशासन व पाटबंधारे विभागाकडून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या