Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यागंगापूर धरणातून 'इतक्या' क्युसेस पाण्याचा विसर्ग

गंगापूर धरणातून ‘इतक्या’ क्युसेस पाण्याचा विसर्ग

नाशिक | Nashik

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यासह शहरात मुसळधार पाऊस (Rain) सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांच्या (Dam) पाणी साठ्यात वाढ झाली आहे. त्यातच जिह्यातील गंगापूर (Gangapur) दारणा (Darna) मुकणे (Mukne) काडवा (kadva) वालदेवी (Waldevi) ही धरणे बऱ्यापैकी भरल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे…

- Advertisement -

जिल्ह्यात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे गंगापूर धरणाच्या (Gangapur Dam) पाणी पातळीत वाढ झाली आहे. आज सकाळी ८ वाजता या धरणातून ३ हजार ६१८ क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे गोदाकाठावर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

तर दारणा धरण (Darna Dam) समुहातील पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने दारणा धरणाच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली असून धरणातून १४ हजार ४०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर मुकणे धरणातून (Mukne Dam) २५०० क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे.

तसेच काडवा धरणातून (Kadva Dam) २ हजार २५० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. याशिवाय वालदेवी धरणातून (Waldevi Dam) १८३ क्युसेस तर आळंदी धरणातून (Aalndi Dam) ८० व भोजापूरमधून ३९९ क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या