Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यादारणा धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ; 'इतक्या' क्युसेसचा विसर्ग

दारणा धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ; ‘इतक्या’ क्युसेसचा विसर्ग

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस (Rain) सुरु आहे. यामुळे धरणांच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. जिल्ह्यातील अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग (Water Discharged) सुरु करण्यात आला आहे…

- Advertisement -

दारणा धरण (Darna Dam) समुहातील पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने दारणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पावसाचा (Rain) जोर टिकून असल्याने दारणा धरणातून (Darna Dam) १० हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे.

पावसाचा (Rain) जोर असाच राहिला तर विसर्गात वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या भागातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

विनायक मेटेंच्या मृत्यूबाबत मोठा गौप्यस्फोट; ऑडीओ क्लिप व्हायरल

दरम्यान, गंगापूर धरणातूनही (Gangapur Dam) १५०० क्युसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तर नांदूरमध्यमेश्वर धरणातून (Nandurmadhyameshwar Dam) २२ हजार ३८४ क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या