गोदामाई खळाळली; होळकर पुलाखालून 'इतके' पाणी

गोदामाई खळाळली; होळकर पुलाखालून 'इतके'  पाणी

नाशिक | Nashik

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यासह शहरात मुसळधार पाऊस (Rain) कोसळत आहे. त्यामुळे जिल्ह्यांतील धरणे (Dam) ८० ते ९० टक्यांपर्यंत भरली असून धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे...

आज सकाळी गंगापूर धरणातून (Gangapur Dam) ३ हजार ६१८ क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यानंतर सायंकाळी ४ वाजताही तितक्याच क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरु असून होळकर पुलाखालून ५ हजार ७१७ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे गोदाकाठावर पूरपरिस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तसेच दारणा धरण (Darna Dam) समुहातील पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने दारणा धरणाच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली असून धरणातून १४ हजार ४१७ क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर मुकणे धरणातून (Mukne Dam) २५०० क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे.

त्याचबरोबर काडवा धरणातून (Kadva Dam) २ हजार २५० तर वालदेवी धरणातून (Waldevi Dam) १८३ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तसेच भोजापूर धरणातून (Bhojapur Dam) ३९९ तर पालखेड धरणातून (Palkhed Dam) ८ हजार १०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com