गोदावरीला येणार पूर; गंगापूरमधून होणार मोठ्या प्रमाणात विसर्ग
Gangapur Dam

गोदावरीला येणार पूर; गंगापूरमधून होणार मोठ्या प्रमाणात विसर्ग

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात (Gangapur dam water Shed) रात्रीपासून संततधार पाऊस सुरु आहे. (Rain in Nashik district) त्यामुळे गंगापूर धरणातून (Gangapur Dam) दुपारी १२ वाजेच्या सुमारास ४ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. तर पुढे तासाभराने म्हणजेच १ वाजता हा विसर्ग ६ हजार क्युसेक करण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गोदावरी नदीला पूर येणार आहे....

रात्रभर धरणाच्या पाणलोट क्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar Taluka) तालुक्याच्या अनेक भागांत पावसाची संततधार सुरु आहे. धरण ९९ टक्के भरले असल्यामुळे पाणीपातळी वाढण्यास सुरुवात होताच धरणातून विसर्ग केला जात आहे.

आज सकाळी साडेआठच्या सुमारास एक हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली होती. (Water discharge from gangapur dam) दरम्यान, नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार हा विसर्ग दुपारी बारा वाजेनंतर चार हजार क्युसेक आणि तासाभराने ६ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

त्यामुळे गंगापूर धरणातून दुपारनंतर एकत्रित ६ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होणार आहे. गोदाघाटावर हेच पाणी दुपारी दोन वाजेनंतर वाढलेले दिसून येणार आहे. (Ramkund Godaghat Nashik) पाण्याची पातळी वाढणार असल्यामुळे नदीकाठी सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गंगापूर धरण परिसात पावसाची सततधार सुरू असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग टप्प्या टप्याने वाढविण्यात येणार आहे. गंगापूर धरण विसर्ग 1 वाजता एकूण 6000 क्युसेक करण्यात येणार आहे.

सूरज मांढरे, जिल्हाधिकारी नाशिक

Related Stories

No stories found.