Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याजायकवाडीसाठी गंगापूरमधून विसर्ग सुरु

जायकवाडीसाठी गंगापूरमधून विसर्ग सुरु

नाशिक | Nashik

जिल्ह्यातील दारणा धरणामधून (Darna Dam) जायकवाडी धरणासाठी (Jayakwadi Dam) शुक्रवारी मध्यरात्री २०० क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर आज रविवारी (दि.२६) रोजी गंगापूर, मुकणे आणि कडवा या धरणातून पाणी (Water) सोडण्यात येणार होते. त्यानुसार आज रविवारी (दि.२६) नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, मुकणे आणि कडवा धरणातून ५०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे….

- Advertisement -

शुक्रवार (दि.२४) रोजी रात्री जिल्हाधिकारी जलज शर्मा (Collector Jalaj Sharma) यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दारणा धरण समूहातून पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मध्यरात्री दारणामधून १९२ क्युसेक तर भंडारदरा- निळवंडेतून १०० क्युसेक इतके पाणी सोडण्यात आले. यानंतर गोदावरी पात्रावरील कालव्यांच्या फळ्या काढण्याचे काम सुरू झाल्यानंतर हळूहळू पुढील विसर्ग करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रविवारी विसर्ग करण्यास सुरुवात केली. निर्धारित पाणी सोडण्याच्या प्रमाणात दारणा धरण समूहातून २.६४३ टीएमसी आणि गंगापूर धरणातून ०.५ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश आहेत.

Weather Update : राज्यातील ‘या’ भागात पुढील चार ते पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता

तर शुक्रवारी सांयकाळपासूनच जलसंपदा विभागामार्फत (Water Resources Department) नदीकाठच्या नागरिकांना नदीपात्रातील ज्या वस्तू ,साहित्य, मोटारी, वाहने आहेत ते बाहेर काढून घ्यावे. तसेच नदीप्रवाहात कुणीही प्रवेश करु नये, नदीपात्राजवळील धार्मिकस्थळी आणि पर्यटनस्थळी नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले होते.

दरम्यान, जायकवाडी धरणासाठी अहमदनगर, नाशिकमधील दारणा तसेच गंगापूर धरण समूहातून पाणी सोडण्याचे आदेश ३० ऑक्टोबर रोजी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने दिले होते. मात्र, नाशिक आणि नगरमधून शेतकरी तसेच लोकप्रतिनिधींनी पाणी सोडण्यास विरोध दर्शविला होता. त्यामुळे न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या. यानंतर न्यायालयाने पाणी सोडण्याला स्थगिती न दिल्याने विसर्गाला प्रारंभ करण्यात आला. दरम्यान सर्वौच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत उत्तर महाराष्ट्रातील धरणांमधून जायकवाडीसाठी ८.५ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. याबाबत पुढील सुनावणी १२ डिसेंबर रोजी होणार आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या