Congress च्या 'लोकशाही वाचवा' कार्यक्रमादरम्यान नेत्यांसह स्टेज अचानक कोसळला... Video Viral

Congress च्या 'लोकशाही वाचवा' कार्यक्रमादरम्यान नेत्यांसह स्टेज अचानक कोसळला... Video Viral

बिलासपूर | Bilaspur

काँग्रेसकडून (Congress) देशभरात अनेक राज्यांमध्ये ‘लोकशाही वाचवा’ मशाल रॅली काढण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर छत्तीसगडमधील (Chhattisgarh) बिलासपूर (Bilaspur) येथे ‘लोकशाही वाचवा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मशाल रॅली संपल्यानंतर काँग्रेस नेते त्याठिकाणी जमलेल्या जनतेला स्टेजवरून संबोधित करत होते. मात्र स्टेजवर काँग्रेस नेत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यामुळे स्टेज अचानक कोसळला आणि यात काही नेत्यांना किरकोळ जखमा आल्यामुळे ते सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. स्टेज कोसळ्याचा व्हिडिओही समोर आला आहे. यावेळी काँग्रेस नेते मोठ्याने घोषणा देताना दिसत आहेत.

Congress च्या 'लोकशाही वाचवा' कार्यक्रमादरम्यान नेत्यांसह स्टेज अचानक कोसळला... Video Viral
“नथुराम गोडसेने गांधींबाबत जे केले ते...”; कालीचरण महाराज पुन्हा बरळले

काँग्रेसच्या 'लोकशाही वाचवा' कार्यक्रमादरम्यान झालेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली. स्टेज कोसळल्यानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. तिथे उपस्थित लोक ओरडू लागल्याचंही व्हिडिओमध्ये ऐकायला मिळतं. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त अद्याप समोर आलं नाही.. मात्र या घटनेत काही नेते जखमी झाले आहेत.

Congress च्या 'लोकशाही वाचवा' कार्यक्रमादरम्यान नेत्यांसह स्टेज अचानक कोसळला... Video Viral
साईबाबांवरील प्रश्नावर बागेश्वर बाबांचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले, “गीदड की खाल…”
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com