Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याएका तळ्यात होती...

एका तळ्यात होती…

निफाड । प्रतिनिधी Niphad

‘माय मरो आणि मावशी जगो’ अशी आईपणाची महती सांगणारी म्हण माणसांसह पशुपक्ष्यांनाही लागू पडते. याचा प्रत्यय आला सहाय्यक वनसंरक्षक सुजित नेवसे (Forest Conservator Sujit Nevese ) यांना. सापडलेली मोराची पाच अंडी ( peacock eggs)कोंबडीच्या( Hen) माध्यमातून उबवून त्यातून चार पिल्ले निघाली आणि कोंबडीने अगदी सख्ख्या आईप्रमाणे पिल्लांना सांभाळल्याने सध्या हा कौतुकाचा विषय ठरला आहे.

- Advertisement -

नववर्षाचे औचित्य साधत मोठ्या प्रमाणावर पर्यटकांनी निफाड येथील वनोद्यानाला भेट दिली. तेव्हा चांदोरी येथील पर्यटक चिमुकल्या गार्गी आहेर हीस निफाड येथील वनोद्यानात कोंबडीमागे पाच मोराची पिल्ले फिरताना दिसली. तीन महिन्यांपूर्वी नांदगावच्या ग्रामीण भागात फिरताना मनमाड येथील सहाय्यक वनसंरक्षक सुजित नेवसे यांना गवतावर पाच अंडी दिसली. ती कोणत्या पक्ष्याची आहेत, हे ओळखून इतर कोणाचा पाय पडून ती फुटतील म्हणून त्यांनी ती अंडी निफाड वनोद्यानात वनपाल भगवान जाधव यांच्याकडे सुपूर्द केली.

जाधव यांनी बाजारातून विकत आणलेल्या कोंबडीने पाचही अंडी उबवली असता त्यातून मोराच्या पिल्लांनी जन्म घेतला. आता हेही पिल्ले आपलीच आहेत, असे समजून त्या कोंबडीने या मोराच्या पिल्लांचेही पालन पोषण सुरू केले. हळूहळू ही पिल्ले कोंबडीसोबत फिरू लागली. सदर मोराची पिल्ले आता तीन महिन्यांची झाली आहेत. ही कोंबडी मोराच्या पिल्लांना माया व प्रेम देते. लांडोरीचे मोराचे पिल्लू आपलेच समजून कोंबडी माया देत आहे. कोंबडीने आवाज दिल्याबरोबर मोराची पिल्ले कोंबडीकडे धावून येतात. दरम्यान, वनपाल भगवान जाधव, वनमजूर चंद्रकांत गावित, भारत माळी, सादिक शेख आदी मोरांच्या पिल्लांची काळजी घेत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या