Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यातील सहा जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा

राज्यातील सहा जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा

नवी दिल्ली । वृत्तसंस्था

महाराष्ट्रात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील ( Konkan and Western Maharashtra ) काही जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून थैमान घातले आहे. काही जिल्ह्यांमध्ये पावसाने उसंत घेतली आहे. पण नद्यांना पूर आल्याने धोका अजूनही कायम आहे. आशा गंभीर स्थितीत हवामान विभागाने मोठा इशारा दिला आहे (meteorological department issued a big warning ). कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दोन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा (Warning of torrential rain ) दिला आहे.

- Advertisement -

गुजरातमध्ये 23 जुलैला काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल. या पावसाची तीव्रता 24 जुलैला वाढेल, असा असा अंदाज दिल्लीतून हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांमध्ये आधीच हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट दिला आहे.

मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच प्रशासनाने या दृष्टीने योग्य ती पावलं उचलावीत अशी सूचना हवामान विभागाने केली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना हा अलर्ट देण्यात आला आहे.

पश्चिम घाटात पुढील दोन ते तीन दिवस काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यानंतर पाऊस ओसरेल, असंही हवामान विभागाने म्हटलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या