Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

शहरातील तापमान काल पुन्हा 40 अंश सेल्सियसपर्यंंत पोचले होते कडक उन्हामुळे ( Summer Season )चैत्रातच वैशाख वनव्यासारखेे वातावरण झाले आहे.

- Advertisement -

गेल्या रविवारी नाशिक जिल्ह्याचे ( Nashik District )तापमान 39 अंशावर स्थिरावले होते.किमान तापमानही 20अंशाच्या जवळपास होते. आता मात्र किमान तापमान 22.4 तर कमाल तापमान 39.9 अंश सेल्सीयस पर्यंंत पोहोचले आहे

.दरम्यान, राज्यात पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या काळात महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा, अशा सूचना हवामान विभागाने (Meteorological Department )नागरिकांना दिल्या आहेत.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, जळगाव, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, अकोला, भंडारा या जिल्ह्यांसाठी इशारा जारी करण्यात आला आहे. यावरून मराठवाड्यासह कोकण, पश्चिम महाराष्ट्रात आणि विदर्भात उष्णतेचा चटका वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तळपत्या उन्हामुळे दुपारी बारा ते चार दरम्यान रस्त्यावर शुकशकाट अनुभवास येत आहे. या दिवसात उष्माघातापासून वाचण्यासाठी शक्यतो उन्हात फिरु नये, पाणी पित रहावे, उन्हातून आल्यावर लगेचच थंंड पाणी पिऊ नये, घरात पंखे सुरु ठेेवावे, खिडक्या उघड्या ठेवाव्यात, थंड पाण्याने स्नान करावे, सुती सैल कपडे परीधान करावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या