Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : वाघाड, ओझरखेड धरण झाले 'ओव्हरफ्लो'

Video : वाघाड, ओझरखेड धरण झाले ‘ओव्हरफ्लो’

ओझे | oze

नाशिक जिल्ह्यातील धरणे ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहेत. आज सकाळी दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) ओझरखेड धरण (Ozarkhed Dam) ओव्हरफ्लो झाले असतानाच आता वाघाड धरणही ओव्हरफ्लो झाले आहे…

- Advertisement -

दिंडोरी तालुक्यात गेल्या पाच दिवसापासून धुवाधार पाऊस पडत असल्यामुळे तालुक्यातील ओझरखेंड व वाघाड हे दोन धरणे १००% भरली असून या धरणाच्या साडव्यातून पाणी पडण्यास सुरुवात झाली आहे.

दिंडोरी तालुक्यातील सर्वात मोठे व दिंडोरी तालुक्यासह निफाड, येवला, मनमाड तालुक्यातील शेतीसह पिण्याच्या पाण्याची ताहान भागवणारे करंजवण धरण ८०% भरले असून करंजवण धरणातून २० हजार ८५२ क्युसेक्स पाणी कादवा नदीपात्रात सोडण्यात आले.

त्याप्रमाणे मांजरपाडा ( देवसाने) प्रकल्प परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पुणे धरणही ८०% भरले असून धरणातून ४ हजार क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग उनंदा नदीपात्रात सोडण्यात आल्यामुळे ओझरखेंड धरण १००% भरले असून साडव्यातून पाणी पडण्यास सुरुवात झाली आहे.

कालपर्यत (दि १२) मृतसाठ्यामध्ये असणारे तिसगाव धरण ८९% भरले आहे. तालुक्यातील करंजवण, वाघाड, पुणेगाव, ओझरखेंड तीसगाव या सर्व धरणातील नद्याचे पालखेड धरणामध्ये येत असल्यामुळे पालखेड धरणातून आज सकाळी ७ वाजता ३६५०० क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग कादवा नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

करंजवण धरणातून २१ हजार क्युसेक्स पाणी कादवा नदीत सोडण्यात आल्यामुळे ओझे करंजवण येथील कादवा नदीवरील पुल रात्री दोन वाजेपासून पाण्याखाली गेला आहे. तसेच म्हेळुस्के लखमापूर येथील कादवा नदीवरील पुलही पाण्याखाली गेला आहे.

या दोन्ही ठिकाणचे पूल पाण्याखाली गेल्यामुळे गावांमधील संपर्क तुटला आहे. दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम परिसरातील ननाशी भागात सकाळ पर्यत ४०७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून तालुक्यात अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे.

तालुक्यात सकाळ पर्यत पडलेला पाऊस

दिंडोरी 104.00 mm

रामशेज 155.00 mm

ननाशी 407.00 mm

उमराळे 140.00 mm

लखमापूर 225.00 mm

कोशिंबे 281.00 mm

मोहाडी 102.00 mm

वरखेडा 191.00 mm

वणी 157.00 mm

करंजवण धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने धरण द्वारपरिचलन पातळी (ROS) पूर्ण झाल्याने व पाण्याची आवक वाढल्यामुळे करंजवण धरणातून २० हजार ८५२ क्युसेक्स विसर्ग कादवा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. करंजवण धरण क्षेत्रात अजूनही पावसाचा जोर कायम असल्यामुळे टप्प्याटप्प्याने पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात येईल यासाठी कादवा नदीपात्रा लगत असणाऱ्या गावांनी सतर्क राहून कुणी नदीपात्रात जाऊ नये.

– शुभंम भालके शाखा अभियंता करंजवण डॅम

- Advertisment -

ताज्या बातम्या