जिल्हा दूध संघासाठी आज मतदान

जिल्हा दूध संघासाठी आज मतदान

*441 मतदार

*19 जागा

*7 केंद्र

* 39 उमेदवार

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (Jalgaon District Cooperative Milk Producers Association) निवडणुकीसाठी (election) उद्या दि. 10 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 यावेळेत मतदान (voting) होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात सात मतदान (Seven polling stations) केंद्र निश्चीत करण्यात आलेली आहे. जिल्हा दूध संघासाठी 441 मतदार (441 voters) मतदानासाठी पात्र असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी (District Election Officer)संतोष बिडवई यांनी दिली. दरम्यान आज मतपेट्यांचे वाटप होऊ त्या केंद्रस्थळी रवाना करण्यात आल्या.

जिल्हा दूध संघासाठी आज मतदान
६१ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा : जळगाव केंद्रातून समर्थ बहुउद्देशीय संस्थेचे 'अर्यमा उवाच' प्रथम

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या 19 जागांसाठी उद्या दि. 10 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 यावेळे मतदान होणार आहे. या निवडणुकीत भाजपा-शिंदे गट प्रणित शेतकरी विकास आणि महाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनल यांच्यात चुरशीचा सामना होणार आहे.

जिल्हा दूध संघासाठी आज मतदान
Visual Story : ड्रिम गर्लने दिल्या तीच्या आयुष्यातील प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

पालकमंत्र्यांसह ग्रामविकास मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

जिल्हा दूध संघाची निवडणूक भाजपा आणि राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केली आहे. एकिकडे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, ना. गिरीश महाजन, आमदारांची फौज तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर असा सामना रंगणार आहे. पॅनलमधील उमेदवारांना निवडून आणण्यासाठी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

जळगाव तालुक्यातील 14 मतदार आज केंद्रावर पोहोचणार

जळगाव तालुक्यात एकूण 22 मतदार मतदानासाठी पात्र आहेत. यातील 14 मतदार हे सहलीवर पाठविण्यात आले आहे. हे सर्व मतदार उद्या दि. 10 रोजी थेट मतदान केंद्रावरच पोहोचणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

जिल्हा दूध संघासाठी आज मतदान
VISUAL Story: अभिनेत्री मृणाल ठाकूरचा बॉसी अवतार पाहाल तर प्रेमातच पडाल !
जिल्हा दूध संघासाठी आज मतदान
मनाेरंजन: दीपिका सर्कसमधुन लावणार ४४० ला करंट : पहा टिझर

जिल्ह्यातील सात केंद्रांवर होणार मतदान

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी सात मतदान केंद्र निश्चीत करण्यात आली आहेत. यात अमळनेर येथे कृऊबास आवारात अमळनेर आणि चोपडा तालुक्यातील 78 मतदार मतदान करतील. तर भुसावळ म्युनिसिपल हायस्कूल येथे भुसावळ, बोदवड आणि मुक्ताईनगर या तालुक्यातील 44 मतदार मतदान करतील. चाळसीगाव येथील हिरूभाई हिमाभाई पटेल प्राथमिक विद्यालय येथे चाळीसगाव तालुक्यातील 58 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. एरंडोल येथील सुर्योदय ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशीय संस्था दत्त कॉलनी येथे एरंडोल, धरणगाव आणि पारोळा येथील 67 मतदार मतदान करतील. फैजपूर येथे मुन्सीपल हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, छत्री चौक येथे रावेर आणि यावल तालुयातील 61, जळगाव तालुक्यात सत्यवल्लभ सभागृह येथे जळगाव आणि जामनेर तालुक्यातील 57 मतदार तर पाचोरा येथे श्री. गो.से. हायस्कूल येथे पाचोरा आणि भडगाव येथील 76 मतदार मतदान करतील.

मतदानासाठी 42, मतमोजणीसाठी 22 कर्मचारी

जिल्हा दूध संघाच्या मतदानासाठी सातही केंद्रांवर एकूण 42 कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून मतमोजणीसाठी 22 कर्मचारी राहणार आहेत. दि. 11 रोजी मतमोजणी होणार असून दुपारी 12 वाजेपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी संतोष बिडवई यांनी दिली.

मतपेट्यांचे वितरण

जिल्हा निवडणूक अधिकारी संतोष बिडवई यांच्या उपस्थितीत शहरातील सत्यवल्लभ सभागृह येथे मतपत्रिका आणि मतपेट्यांचे वर्गीकरण करण्यात आले. त्यानंतर केंद्रस्थळी नियुक्त केलेल्या कर्मचार्‍यांना मतपेट्यांचे वितरण करून त्या केंद्रावर रवाना करण्यात आल्या.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com