अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

मतदानासाठी यंत्रणा सज्ज
अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

शिवसेना आमदार रमेश लटके ( Ramesh Latke )यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी (For the by-election of Andheri East Assembly Constituency) आज, गुरुवारी मतदान होत आहे. राज्यातील सत्तांतरानंतरची ही पहिलीच पोटनिवडणूक असून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना प्रथमच धनुष्यबाण चिन्हाऐवजी मशाल या निवडणूक चिन्हावर लढत आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या नव्या चिन्हाला मतदारांचा कसा कौल मिळतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्यासह सात उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने ( BJP)या पोटनिवडणुकीतून माघार घेतली असली तरी लटके यांच्यासमोर छोटे पक्ष आणि अपक्ष उमेदवारांचे आव्हान आहे. पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार नसला तरी भाजपचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नोटाचा प्रचार चालवल्याचा आरोप शिवसेना नेते अनिल परब यांनी केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत नवा वाद निर्माण झाला आहे.

दरम्यान, आज अंधेरी पूर्व मतदारसंघात ३८ मतदान केंद्रावर मतदान होईल. मतदानासाठी एकूण २ लाख ७१ हजार ५०२ मतदार पात्र आहेत. मतदान पारदर्शी आणि निर्भय वातावरणात पार पडावे म्हणून प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. या पोटनिवडणुकीची मतमोजणी ६ नोव्हेंबरला होऊन निकाल घोषित केला जाईल.

अंधेरी पोटनिवडणुकीतील उमेदवार

ऋतुजा लटके शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी, पीपल्स)

मनोज श्रावण नायक (राईट टू रिकॉल पार्टी)

नीना खेडेकर (अपक्ष)

फरहाना सिराज सय्यद (अपक्ष)

मिलिंद कांबळे (अपक्ष)

राजेश त्रिपाठी (अपक्ष)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com