जिल्ह्यातील 40 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

जिल्ह्यातील 40 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील 40 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी ( Grampanchayat Elections ) आज (दि.4) मतदान होत आहे. तब्बल 498 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. जिल्हा प्रशासनाकडून मतदानासाठीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

राज्यातील सत्तांतरनंतर प्रथमच ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा आखाडा रंगत आहे. त्यामुळे इच्छुकांसह सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. जिल्ह्यातील 40 ग्रामपंचायतींमध्ये सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच यावेळेत मतदान होणार आहे. त्यासाठीची प्रशासनाने तयारी पुर्ण केली आहे. 128 ईव्हीएमवर मतदान घेण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रावर पाच याप्रमाणे मतदान केंद्र अधिकारी व कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत निवडणूकांसाठी तब्बल 870 ऊमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी छाननी अंती सर्वच्यासर्व अर्ज वैध ठरविण्यात आले. माघारीच्या मुदतीपर्यंत एकुण 258 जणांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे 114 उमेदवार हे बिनविरोध निवडून आले. तर निवडणूकीच्या अंतिम रिंगणात 498 उमेदवार नशिब आजमावत आहेत. मतदार आता कोणाच्या पारड्यात मत टाकणार हे शुक्रवारी (दि.5) मतदान मोजणीनंतरच स्पष्ट होईल.

ग्रामपंचायतींची संख्या

तालुका संख्या

नाशिक 13

नांदगाव 06

सिन्नर 02

चांदवड 01

दिंडोरी 13

येवला 04

निफाड 01

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com