Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यामविप्रच्या 24 जागांसाठी आज मतदान

मविप्रच्या 24 जागांसाठी आज मतदान

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत ( Maratha Vidyaprasark Samaj Sanstha Elections )कार्यकारी मंडळाच्या 24 जागांसाठी आज (दि.28) मतदान ( Voting )होत असून उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. जिल्ह्यात एकूण 53 बूथवर मतदान होणार आहे.संस्थेचे 10 हजार 197 सभासद मतदानाचा हक्क बजावतील.

- Advertisement -

या निवडणुकीत सत्ताधारी नीलिमा पवार यांचे प्रगती पॅनल आणि अ‍ॅड. नितीन ठाकरे यांचे परिवर्तन पॅनल यांच्यात सरळ लढत होत आहे. काही पदांकरीता स्वतंत्र उमेदवार देखील निवडणूक रिंगणात आहेत. यावेळच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच कार्यकारिणीत उपाध्यक्ष आणि महिला प्रतिनिधींचे दोन अशा तीन अतिरिक्त जागांचा समावेश आहे. सोमवारी (दि.29) मतमोजणी होणार आहे.

मविप्र संस्थेची सण 2022 ते 27 या कालावधीसाठी पंचवार्षिक निवडणूक होत आहे. रविवारी (दि.28) सकाळी 8 वाजेपासून संस्थेचे सभासद मतदानाचा हक्क बजावतील. मतदानासाठीची प्रशासकीय तयारी पूर्ण झालेली आहे. प्रचारादरम्यान दोन्ही पॅनलकडून विविध तालुक्यांमध्ये दौरा काढत सभासदांशी संवाद साधण्यासाठी सभा, मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते.

सरचिटणीस पदासाठी नीलिमा पवार आणि अ‍ॅड.नितीन ठाकरे यांच्यातील सरळ लढत लक्षवेधी असून, अध्यक्षपदासाठी डॉ.सुनील ढिकले आणि आमदार माणिकराव कोकाटे यांच्यात काट्याची लढत आहे. सभापतिपदासाठी माणिकराव बोरस्ते आणि बाळासाहेब क्षीरसागर या निफाडवासीयांमध्ये लढत होत आहे. त्यामुळे या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष केंद्रित झाले आहे. दोन्ही पॅनलने उमेदवार निश्चित क्षेत्रीय समतोल साधल्याने आता सभासद कोणाला पसंती देतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहाणार आहे.

पोलिसांकडून पाहणी

पोलीस उपायुक्त दीपाली खन्ना यांनी मतदान केंद्रावर पाहणी केली. मतदान केंद्रावरील व्यवस्था, मतमोजणी केंद्रावरील व्यवस्था, मतपेटी ठेवण्यासाठी केलेली मुद्देमाल रूमची व्यवस्था याबाबत पाहणी केली. निवडणूक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड भास्करराव चौरे यांनी संस्थेची घटना व निवडणूक नियमांबाबत त्यांना माहिती दिली. निवडणूक मंडळाने केलेल्या मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांना छायाचित्र ओळखपत्राशिवाय कोणालाही प्रवेश करता येणार नाही, याबाबत नियोजन करण्यासंदर्भात सूचना केली. निवडणूक मंडळाचे सदस्य अ‍ॅड. रामदास खांदवे, अ‍ॅड. महेश पाटील, सचिव डॉ.डी. डी.काजळे, ए.टी खालकर उपस्थित होते.

मतदानासाठी तयारी पूर्ण

रविवारी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान.

यावेळी प्रथमच उपाध्यक्ष, दोन महिला प्रतिनिधींसाठी मतदान

6,844 पुरुष, 1,353 महिला सभासद करणार मतदान

6 रंगाच्या असणार मतपत्रिका

तालुकानिहाय

सभासद संख्या

निफाड 2,903

सटाणा 1,416

नाशिक शहर 876

नाशिक ग्रामीण 707

दिंडोरी-पेठ 838

मालेगाव 783

चांदवड 684

देवळा 567

सिन्नर 443

कळवण-सुरगाणा 348

नांदगाव 292

येवला 202

इगतपुरी 138

एकूण 10,197

- Advertisment -

ताज्या बातम्या