धुळ्यासह विधान परिषदेच्या सहा जागांसाठी मतदानास सुरुवात

महाविकास आघाडी विरुद्ध भाजप प्रथमच थेट सामना
धुळ्यासह विधान परिषदेच्या सहा जागांसाठी मतदानास सुरुवात

धुळे, मुंबई

विधान परिषदेच्या धुळ्यासह सहा जागांसाठी मंगळवारी सकाळी मतदानास सुरुवात झाली. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना या निवडणुकीत आहे. 3 डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार स्थानिक मतदार संघातील पोट निवडणुकीसाठी आज सकाळी 8 वाजता मतदानाला प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सकाळीच मतदान केंद्रावर जाऊन पाहणी केली. या मतदार केंद्रात भाजपतर्फे अमरीशभाई पटेल आणि कॉंग्रेसच्या वतीने अभिषेक मोतीलाल पाटील हे उमेदवारी करीत आहेत. दोन्ही जिल्ह्यातील दहा केंद्रांवर आज सकाळीपासून 8 ते संध्याकाळी 5 पर्यंत मतदान होणार आहे.

औरंगाबाद विभाग, पुणे आणि नागपूर अशा पदवीधरच्या तीन आणि अमरावती व पुणे शिक्षक मतदारसंघाच्या दोन जागांसाठी हे मतदान होणार आहे. शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसने (congress) महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यानंतर पहिल्यांदाच पदवीधर निवडणुकीला सामोरे जात आहे. महाविकास आघाडीविरोधात भाजपचे प्रमुख विरोधी पक्ष नेते म्हणून निवडणूक लढवत आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन 1 वर्ष पूर्ण होतानाच तीन पक्षात संघटनात्मक ऐक्य निवडणुकीत आहे का यांचे चित्र स्पष्ट होईल.

तर दुसरीकडे भाजप नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. भाजपात नागपूर पदवीधर निवडणूक ही विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांच्यासाठी तर उर्जा मंत्री नितीन राऊत, विजय वड्डेटीवार, अनिल देशमुख यांच्याशी प्रतिष्ठेची निवडणूक असणार आहे.

अजित पवार, देवेंद्र फडणवीस, जयंत पाटील, चंद्रकांत पाटील, अशोक चव्हाण, नितीन राऊत, विजय वड्डेटीवार, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, आशिष शेलार, धनंजय मुंडे, प्रीतम मुंडे, सतेज पाटील, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर या नेत्यांनी प्रचार करत राजकीय आरोपाच्या फेरी झाडल्या आहे. त्यामुळे आता मतदान कुणाच्या पारड्यात पडत हे पाहण्याचे ठरणार आहे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com