'सावाना'साठी आज मतदान

'सावाना'साठी आज मतदान

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणूक( Election of Sarvajanik Vachnalya Nashik ) प्रक्रियेचा अंतिम टप्पा जवळ आला आहे.आज (दि.8) रोजी 18 जागांसाठी मतदान ( voting )होत आहे.

यात अध्यक्षपदासाठी 1, उपाध्यक्षपदासाठी 2 तर इतर कार्यकारिणीसाठी 15 जागा आहेत. अध्यक्ष पदासाठी दिलीप फडके आणि वसंत खैरनार तर उपाध्यक्षपदासाठी सुनील कुटे, विक्रांत जाधव, दिलीप धोंडगे, मानसी देशमुख यांच्यात सरळ लढत होणार आहे.

दरम्यान, मतदान केंद्र दोन वेळा बदलल्यानंतर आता वायडी बिटको गर्ल्स हायस्कूलमध्ये हे मतदान होत आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. याठिकाणी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदान केंद्रावर दहा बूथ असणार असून उन्हापासून बचाव होण्यासाठी या ठिकाणी मंडपाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

मतदारांनी शांतता राखत या ठिकाणी मतदान करण्याचे आवाहन देखील निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.