एनडीएसटी पतसंस्थेसाठी होणार 'या' दिवशी मतदान

जिल्ह्यातील 26 विविध सहकारी बँका,पतसंस्था निवडणूक प्रक्रिया सुरू
एनडीएसटी पतसंस्थेसाठी होणार 'या' दिवशी मतदान

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्यातील विविध सहकारी सोसायटया (Various cooperative societies), बँका (banks), साखर कारखान्यांच्या (Sugar Factories) पंचवार्षिक निवडणुकांचा (election) मार्ग खुला झाल्यानंतर, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने (District Deputy Registrar Office) जिल्हयातील 42 संस्थांच्या निवडणुक कार्यक्रम (Election program) तयार करत सहकार प्राधिकरणाकडे सादर केला होता.

सहकार प्राधिकरणाने त्यास मंजुरी दिली असून, पहिल्या टप्यातील निवडणुका (election) जाहीर झाल्या आहेत. यात नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स अ‍ॅण्ड नॉन टिचींग क्रेडीट सोसायटी (Nashik District Secondary Teachers and Non Teaching Credit Society) अर्थात एनडीएसटी (NDST) पतसंस्था, मविप्र सेवक सोसायटी, जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था, ग्रामसेवक पतसंस्थेचा समावेश आहे.

नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स अ‍ॅण्ड नॉन टीचिंग एम्प्लॉई क्रेडिट सोसायटी (Nashik District Secondary Teachers and Non Teaching Employees Credit Society) अर्थात एनडीएसटीची (NDST) निवडणूक शनिवारी (दि. 15) तर मतमोजणी रविवारी (दि.16)होणार आहे.

जिल्ह्यातील शिक्षकांची (teachers) सर्वात मोठी पतसंस्था म्हणून ओळख असलेल्या एनडीएसटी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी जुलै 2022 मतदान (voting) होणार होते. परंतू, सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिल्याने ही निवडणूक प्रक्रिया (Election process) थांबली होती. आता पुन्हा निवडणूक जाहीर झाली असून शनिवारी 21 जागांसाठी मतदान होणार आहे.

10 हजार 19 शिक्षक सभासद मतदानाचा हक्क बजावतील. 21 जागांसाठी तब्बल 57 उमेदवार रिंगणात असून ते आपले नशीब अजमावित आहे. निवडणुकीत तीन उतरले असले तरी, सत्ताधारी गटाच्या टीडीएफ-प्रगती पॅनल,विरोधी गटाचे परिवर्तन पॅनलमध्ये लढत होत आहे. मतदानाची तारीख जाहीर झाल्याने प्रचारासाठी केवळ पाच दिवसांचा कालावधी असल्याने दोन्ही पॅनकडून, पुन्हा तालुकानिहाय प्रचार दौरे सुरू झाले आहेत.

मविप्र सेवक सोसायटीसाठी 13 रोजी मतदान

नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज सेवक सहकारी पतसंस्था नवीन कार्यकारणी नियोजित निवडणूक प्रक्रियेवर अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेल्यानंतर लागू करण्यात आलेली स्थगिती अखेर हटविण्यात आली आहे. आता मविप्र सेवक सोसायटीसाठी 13 नोव्हेंबरला मतदान होणार असून मतदान संपल्यानंतर तत्काळ अर्ध्या तासाच्या कालावधीनंतर मतमोजणी होणार आहे.

मविप्र सेवक सोसायटी निडणूक प्रक्रियेंतर्गत उमेदवारी अर्ज दाखल करणे, दाखल अर्जांची यादी जाहीर करणे व वैध अर्जाची अंतिम यादी जाहीर करण्याचे टप्पे पूर्ण झाले आहेत. नामनिर्देशनपत्र दाखल करणाजया इच्छुकांना 17 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत त्यांचे अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर 1 नोव्हेंबरला चिन्ह वाटप होणार असून 13 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

26 विविध सहकारी बँका व पतसंस्था

जिल्ह्यातील 26 विविध सहकारी बँका पतसंस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू आहे.ज्या बँका व पतसंस्थांचे मतदान होऊन लगेचच दुसर्‍या दिवशी मतमोजणी होणार आहे.त्या बँका व पतसंस्था पुढील प्रमाणे - कंसात मतदानाची तारीख बिझनेस बँक (दि.31 ऑक्टोबर), वणी मर्चंट को.ऑ.बँक (दि.31 ऑक्टोबर),सरस्वती बँक ओझर (6 नोव्हेंबर ),मालेगाव मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक (दि.5 नोव्हेंबर) पिंपळगाव बसवंत बँक (दि.8 नोव्हेंबर)

लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँक (दि.8 नोव्हेंबर) ओझर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक (दि.13 नोव्हेंबर) समर्थ सहकारी बँक नाशिक (दि.13 नोव्हेंबर) जनलक्ष्मी सहकारी बँक (दि. 13 नोव्हेंबर) निफाड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक (दि.16 नोव्हेंबर) आर.डी. आप्पा क्षीरसागर सहकारी पतसंस्था (दि.13 नोव्हेंबर), येवला मर्चंट बँक (दि.13 नोव्हेंबर),मविप्र सेवक पतसंस्था (दि.13 ग्रामसेवक पतसंस्था (दि.12 नोव्हेंबर).

जि.प. कर्मचारी पतसंस्था

जिल्हा परिषदेच्या सेवकांची आर्थिक वाहिनी असलेल्य जि.प. कर्मचारी सहकारी पतसंस्थेसाठी 6 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. 27 ऑक्टोंबर 202 पर्यंत माघारीसाठी मुदत देण्यात आली आहे. 28 ऑक्टोंबरला उमेदवारांना चिन्हाचे वाटप होईल. त्यानंतर 6 नोव्हेंबर रोजी मतदान होऊन लागलीच मतमोजणी होईल. 15 जागांसाठी संवर्गांतून विक्रमी 106 अर्ज प्राप्त झालेले आहेत. कर्मचाजयांच्या हक्काची पतसंस्था असून आतापर्यंत ही निवडणुक बिनविरोध पार पाडली असून यंदाची निवडणुक बिनविरोध करण्याचा प्रयत्न आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com