मतदार यादी ऑनलाइन की ऑफलाईन; संभ्रम कायम

मतदार यादी ऑनलाइन की ऑफलाईन; संभ्रम कायम

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या (Nashik Municipal Election) दृष्टीने 133 जागांपैकी 67 जागा महिलांसाठी राखीव झाल्यानंतर येत्या 17 जून रोजी अंतिम प्रारूप मतदार यादी (Voter list) प्रसिद्ध होणार आहे.

यासाठीची जोरदार तयारी महापालिका प्रशासनाच्या (Municipal administration) वतीने सुरू आहे. मात्र निवडणूक आयोगाने (Election Commission) अद्याप कोणत्या पद्धतीने यादी प्रसिद्ध करायची याबाबत स्पष्ट निर्देश दिले नसल्याचे समजते आहे. यामुळे मतदार यादी ऑफलाइन (Voter list offline) मिळणार की ऑनलाईन (online) प्रसिद्ध होणार याबाबत संभ्रम कायम असल्याचे दिसून येत आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे नाशिक महापालिका प्रशासनातर्फे (Nashik Municipal Administration) प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या अनुषंगाने लगबग सुरू आहे.

प्रशासनातर्फे सर्व तयारी सुरू आहे. मात्र ही यादी ऑनलाईन की विभागिय कार्यालयांमध्ये फलकांवर जाहिर करायची याबाबत आयोगाचे स्पष्ट निर्देश नसल्याने प्रशासनात संभ्रम निर्माण झाला आहे. 31 मे रोजी महिला आरक्षणाची (women's reservation) सोडत झाल्याने महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. आरक्षण (reservation) सोडतीनंतर निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला इच्छुकांकडून सुरवात झालेली आहे. अशात येत्या 17 जूनला महापालिका प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाची तयारी सुरू आहे. सुमारे एक हजार मतदार याद्यांत बारा लाख मतदारांच्या नावाचा समावेश असल्याची शक्यता आहे. यंदाच्या निवडणुकीतून महापालिकेत नगरसेवकांची संख्या वाढणार असून, 122 ऐवजी 133 नगरसेवक नाशिककर मतदार निवडणार आहेत. या वाढीव अकरा जागांसह सर्वच जागांकरिता इच्छुकांची तयारी सध्या सुरू आहे. त्याच बरोबर प्रभागांची संख्याही 44 वर गेली आहे. त्यामुळे नव्या प्रभागरचनेनुसार प्रभाग निहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com