Vodafone-Idea चे नेटवर्क गायब, लाखो ग्राहकांना फटका

Vodafone-Idea चे नेटवर्क गायब, लाखो ग्राहकांना फटका

मुंबई | Mumbai

देशातील आघाडीची मोबाईल सेवा पुरवठादार असलेल्या व्होडाफोन-आयडियाचे मोबाईल (Vodafone-Idea down) नेटवर्क पुन्हा ठप्प झाले आहे.

अनेक भागात मोबाईलचे नेटवर्क (Mobile Network) डाऊन झाल्याने याचा फटका लाखो ग्राहकांना बसला आहे. कंपनीच्या या ढिसाळ कारभारावर सोशल मीडियावर ग्राहकांकडून जोरदार टीका केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही यूजर्सना इंटरनेट वापरताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर आपल्या व्यथा मांडत तक्रार केली आहे.

ट्विटरवर अनेक व्हीआय युजर्सने तक्रार केली आहे की, त्यांना व्हीआय नेटवर्क चालत नाही. नेटकऱ्यांना सर्व्हर डाऊन असल्यामुळे संताप व्यक्त केला आहे. व्हीआयचं नेटवर्क डाऊन असल्यामुळे अनेकांची कामं रखडली आहेत.

यापूर्वी म्हणजेच २२ जानेवारीला व्होडाफोन-आयडियाने अलर्ट जारी केला होता. यामध्ये १३ तास युजर्स मोबाईलचा रिचार्ज करु शकणार नाहीत. असे सांगण्यात आले होते. व्होडाफोन-आयडिया सिस्टीम अपडेट करण्याचे काम सुरु असल्याची माहिती देण्यात आली होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com