Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशSuccess Story : मुलाला दिसत नव्हते म्हणून आईने लिहिला पेपर; 'युपीएससी'त मिळवली...

Success Story : मुलाला दिसत नव्हते म्हणून आईने लिहिला पेपर; ‘युपीएससी’त मिळवली दहावी रँक

नवी दिल्ली | प्रतिनिधी New Delhi

आपण दिव्यांग आहोत… आपल्याला हे जमणार नाही… ते जमणार नाही अशा मानसिकतेत न अडकता नैराश्यातही न जाता यूपीएससीचा पेपर लिहिण्यासाठी आईला घेऊन गेलेला उमेदवार पहिल्या दहामध्ये आला आहे….

- Advertisement -

स्वप्न पाहण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी डोळ्यांची नव्हे तर धैर्य आणि इच्छाशक्ती लागते हे नवी दिल्लीच्या सम्यक जैन (Samyak Jain New Delhi) या विद्यार्थ्याने सिद्ध केले आहे. सम्यक (Samyak Jain) डोळ्यांनी पाहू शकत नव्हते. परंतु, त्यांनी आयएएस होण्याचे स्वप्न जे पाहिले होते ते पूर्ण करण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न सुरु केले.

नुकत्याच जाहीर झालेल्या यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2021 च्या निकालात सम्यक यांनी 7 वा क्रमांक (Samyak Jain UPSC Rank) मिळवून टॉप-10 मध्ये स्थान मिळवले.

हा प्रवास सोपा नव्हता. माझ्या यशात कुटुंबाचा मोठा वाटा आहे. डोळ्यांनी दिसत नाही त्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा अभ्यासक्रम वाचून पूर्ण करून दिला. सम्यकने हे सर्व संस्मरणात ठेवण्याचे काम केले. त्यांची आई वंदना जैन यांनी त्यांचा पेपर लिहिला. मी आईला प्रश्नांची उत्तरे सांगत होतो आणि आईने उत्तरे लिहित होती असे सम्यक म्हणाला. सम्यक यांचे वडील विमानसेवेत आहेत. त्यांचे मामा त्यांना पेपरसाठी घेऊन जात असत.

कोण आहेत सम्यक?

सम्यक यांनी दिल्ली विद्यापीठाच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. सम्यकने मुंबईतून शालेय शिक्षण आणि दिल्ली विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. हळूहळू त्यांची दृष्टी कमी होऊ लागली. वयाच्या 20 वर्षांनंतर, वयाच्या 23 किंवा 24 व्या वर्षी सम्यकला डोळ्यांनी दिसणे पूर्णपणे बंद झाले. सम्यकने त्याच्यापूढे असलेली आव्हाने सोडली नाहीत. त्याने अभ्यास सोडला नाही. ग्रॅज्युएशननंतर त्याने जेएनयूमधून इंटरनॅशनल रिलेशनल रिलेशनमध्ये पदवी मिळवली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या