Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याSuccess Story : शरीरावर ७ गोळ्यांचे घाव,एक डोळाही गमावला; पण 'त्यांनी' जिद्दीने...

Success Story : शरीरावर ७ गोळ्यांचे घाव,एक डोळाही गमावला; पण ‘त्यांनी’ जिद्दीने केली ‘यूपीएससी’ क्रॅक

नवी दिल्ली | प्रतिनिधी | New Delhi

तुम्ही तुमच्या ध्येयावर ठाम असाल तर कोणीही तुम्हाला स्वप्न पूर्ण करण्यापासून रोखू शकत नाही. तसेच तुमच्यात मेहनतीची जोड असेल तर ध्येय कितीही कठीण असले तरी ते साध्य करता येते.अशीच एक प्रेरणादायी गोष्ट सांगणारी घटना घडली आहे…

- Advertisement -

नुकताच तीन दिवसांपूर्वी यूपीएससीचा (UPSC) निकाल जाहीर झाला. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी खडतर परिस्थितीवर मात करून परीक्षेत घवघवीत यश मिळवले. यातील अशाच एका अधिकाऱ्याचा प्रवास रंजक ठरला आहे. अलीगडच्या (Aligarh) डोरी नगरचे रहिवाशी असलेले रिंकू सिंह राही (Rinku Singh Rahi) यांनी १३ प्रयत्नानंतर युपीएससी परीक्षेत यश मिळवले असून त्यांना ६८३ वा रँक (UPSC Rank) मिळाला आहे.

रिंकू सिंह राही हे २००४ च्या बॅचचे पीसीएस अधिकारी (PCS officers of 2004 batch) असून हापुडी (Hapudi) येथील समाज कल्याण विभागात (social welfare department) अधिकारी आहेत.समाज कल्याण विभागात काम करत असतानाच त्यांनी युपीएससीची तयारी सुरू ठेवली होती.

त्यानंतर आता रिंकू सिंह राही हे पीसीएसहून आयएएस अधिकारी (IAS officer) झाले आहेत. २००४ मध्ये रिंकू सिंह यांनी पीसीएस अधिकारी (PCS officers) म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुझफ्फरनगर (Muzaffarnagar) येथे झाली होती. तिथे एका भ्रष्टाचार प्रकरणातील (corruption case) चौकशी ते करत होते. त्याचदरम्यान २००८ मध्ये त्यांच्यावर राहत्या घरी जीवघेणा हल्ला (deadly Attack) करण्यात आला.

यावेळी हल्लेखोरांनी त्यांच्यावर सात गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात त्यांचा एक डोळा कायमचा निकामी झाला पण त्यांनी हार मानली नाही. जवळपास चार महिने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार (Treatment) सुरू होते. त्यानंतर ते बरे झाले. जीवघेण्या हल्ल्यानंतरही रिंकू सिंह राही घाबरले नाही. त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात आपली मोहीम कायम ठेवली. आपले काम देखील सुरूच ठेवले. त्यानंतर रिंकू सिंह राही यांनी जिद्दीने UPSC क्रॅक केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या