राजभवन भेटीची योजना पुन्हा सुरु होणार; संकेतस्थळावर नोंदणी सुरु

राजभवन भेटीची योजना पुन्हा सुरु होणार; संकेतस्थळावर नोंदणी सुरु

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

तीन महिन्यांच्या पावसाळी अवकाशानंतर येत्या १ ऑक्टोबरपासून राजभवन ( Rajbhavan )भेटीची योजना पुन्हा सुरु होत आहे. त्यासाठी १० सप्टेंबरपासून राजभवनाच्या संकेतस्थळावर नोंदणी सुरु करण्यात आली आहे.

राजभवन भेटीची वेळ सकाळी ६ ते सकाळी ८.३० अशी असेल आणि प्रतिदिवशी ३० लोकांना भेट देता येईल. राजभवन हेरिटेज टूर मध्ये सूर्योदय गॅलरी, देवी मंदिर, भूमिगत बंकर, क्रांतिकारकांचे दालन, दरबार हॉल, जलविहार सभागृह आणि महाराष्ट्र राज्य स्थापना स्मारक येथे भेट येईल.

राजभवन भेटीचे दिवस मंगळवार ते रविवार असे असतील. सोमवारी तसेच शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी राजभवन भेट बंद असेल असे राजभवनातर्फे कळविण्यात आले आहे. दिवाळीमुळे २२ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत भेट देता येणार नाही, असे राजभवनातून स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com